स्थैर्य, नवी दिल्ली, दि. २१ : देशातील रेल्वे स्थानकांचं आधुनिकीकरण आणि त्यांची विकासकामं लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी स्थानकांचा लिलाव करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी दिली आहे.
मर्चंट्स चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीमार्फत (MICCI) आयोजित वेबिनारमध्ये रेल्वेमंत्री गोयल बोलत होते.
रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणासाठीच्या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात रेल्वे स्थानकांचा लिलाव करून खासगी कंपन्यांकडे त्याची देखभाल सोपवली जाईल. देशातल्या पहिल्या 12 खासगी रेल्वे 2023 पर्यंत धावू लागतील. यांची संख्या वाढत जाऊन 2027 वर्षापर्यंत 151 गाड्या धावताना दिसतील, असंही गोयल म्हणाले.