0.5 टक्क्यांपेक्षाही कमी रुग्ण व्हेंटीलेटर्सवर, 2% अतिदक्षता विभागात आणि 3.5% पेक्षाही कमी रूग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज
स्थैर्य, सातारा, दि.४: केंद्र सरकारच्या टेस्ट-ट्रॅक-ट्रीट धोरणातील उद्दिष्टांपैकी एक म्हणजे कोविडचा मृत्यूदर कमी करणे आणि रुग्णांची मृत्यूसंख्या आटोक्यात ठेवणे हा आहे. रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने वाढता राहील याकडे विशेष लक्ष दिले जात असून त्यासाठी वैद्यकीय उपचारांचे प्रोटोकॉल पाळत सर्वांना एक प्रमाणित वैद्यकीय उपचार मिळतील यावर भर दिला जात आहे.
जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतातील रुग्ण मृत्यू दर तर कमी आहेत आणि तो सातत्याने कमी होत आहे, (सध्याची आकडेवारी -1.74 %), त्यासोबतच, कोविड संसर्ग झालेल्या एकूण रूग्णांपैकी अगदी थोडे, म्हणजे 0.5% रुग्ण सध्या व्हेंटीलेटरवर आहेत. आकडेवारीनुसार, केवळ 2 टक्के रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून, 3.5 टक्यांपेक्षाही कमी रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याची गरज आहे.
या सर्व उपाययोजनांमुळे भारतातील कोविड-19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आज 30 लाखांच्या (30,37,151) वर पोहोचली आहे.
गेल्या 24 तासात देशभरातील 66,659 रुग्ण बरे झाले असून सलग आठव्या दिवशी दररोज 60000 रुग्ण बरे होण्याच्या विक्रमातील सातत्य भारताने कायम राखले आहे. कोविड-19 रुग्णांचा बरे होण्याचा दर आता 77.15% असून, गेल्या काही महिन्यांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचेच हे निदर्शक आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असतांनाच उपचाराखालील सक्रीय रुग्ण आहे बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येतील तफावतही वाढते आहे. आज ही तफावत 22 लाखांच्या पुढे गेली आहे. यामुळे सध्या देशात कोरोनाच्या सक्रीय रुग्णांची संख्या 8,31,124 इतकी आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रमाणात ही संख्या 21.11 टक्के इतकी आहे.
कोविड19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना बघायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/.
तांत्रिक गोष्टींच्या माहितीसाठी संपर्क साधायचा असल्यास, या ईमेल आय डी वर साधावा: [email protected] आणि इतर शंका/समस्यांसाठी ईमेल आयडी- [email protected] .
कोविड19 संदर्भात इतर माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक (हेल्पलाईन): +91-11-23978046 or 1075 (Toll-free). सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या हेल्पलाईन्सची यादी सोबत जोडली आहे.
https://www.mohfw.gov.in/pdf/coronvavirushelplinenumber.pdf .