स्थैर्य,जालना,दि ९: सध्या देशभर नवीन कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. परंतू, या आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा अजब दावा भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार; आता पुढील सुनावणी 25 जानेवारीला
जालन्यातील एका कार्यक्रमादरम्यान दानवे बोलत होते. यावेळे ते म्हणाले की, हे आंदोलन सुटा बुटातल्या लोकांचे आहे. केंद्र सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे. सध्या दिल्लीत जे आंदोलन सुरू आहे, त्यात पाकिस्तान आणि चीनचा हात आहे. याच देशांनी CAA च्या नावाखाली मुस्लिम समाजाला उचकवले होते. आता भारतातील शेतकऱ्यांनी याचा विचार करायला हवा, असे आवाहनदेखील दानवे यांनी यावेळी केले.