दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । मुंबई । बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. २३८ शिवडी यांच्या विद्यमाने सालाबादप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा जयंती महोत्सव मा. रमेशजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी सरचिटणीस पप्पू जाधव यांनी प्रास्ताविक सादर केले तर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा समीर महाडिक यांनी पेलवली.
सदर प्रसंगी जयंती महोत्सव प्रीत्यर्थ शाखेच्या धडाडीच्या महिला कार्यकर्त्या श्रावणी सतीश पवार, प्रज्ञा प्रदीप शिरगावकर यांना माननीय गटविभाग प्रमुख राजाभाऊ तथा रामदास गमरे, माजी गतप्रतिनिधी प्रकाश कासे, दत्तात्रेय सागरे, प्रदीप तांबे, नरेंद्र कदम तसेच आजी माजी कार्यकारिणी मंडळ, महिला मंडळ यांच्या उपस्थितीत “भीमरत्न पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले तसेच कुणाल जाधव, अनिकेत जाधव, राहुल विलास जगताप व इतरही कार्यकर्त्यांना वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सदर चार दिवसीय कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने आखून तो व्यवस्थित, शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी होण्यासाठी नवीन कार्यकारिणी व महिला मंडळ यांनी अतोनात प्रयत्न करून सदर चार दिवसीय कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल कार्यक्रम अध्यक्ष रमेश बाबू मोरे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.