
दैनिक स्थैर्य | दि. ६ मार्च २०२३ | फलटण |
थोर साहित्यिक, एक विचारवंत, संवेदनशील कवी, संशोधक, पत्रकार, समीक्षक, इतिहासाचा गाढा अभ्यासक व समाज सुधारणेसाठी अहोरात्र झटणारा तळमळीचा कार्यकर्ता तसेच ‘आद्य महाग्रंथ : कुलदैवत खंडोबा’ हा संशोधनपर ग्रंथ, ‘कृष्णाकाठचे भयपर्व’ ही बापू बिरू वाटेगावकर यांच्या जीवनावर आधारलेली व्यक्तीचित्रणात्मक कादंबरी व काही अप्रकाशित साहित्यकृतींचे लेखक, लोकसाहित्यिक, ‘जय मल्हार’ मालिकेचे तज्ज्ञ सल्लागार, ‘दुधेबावी भूषण’ मा. डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांचे अकाली निधन झाले आहे.
डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे यांचे जाणे मनाला चटका लावणारी घटना आहे. डॉ. ठोंबरे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गुरुवार, दि. ९ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता दुधेबावी सभागृह, दुधेबावी (ता. फलटण) येथे कथाकथनकार, ग्रामीण साहित्यिक प्रा. रवींद्र कोकरे यांचे अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन केले आहे.
या शोकसभेस सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले आहे.