दिव्यांग व्यक्तींचा भाऊ बनून त्यांच्या समस्या सरकार दरबारी मांडणार : आमदार सचिन पाटील


दैनिक स्थैर्य । दि. 24 जुलै 2025 । फलटण । दिव्यांग व्यक्तींचा भाऊ बनून त्यांच्या अडी अडचणी सरकार दरबारी मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करीन व दिव्यांग व्यक्तींच्या विकासाकरिता राज्यातील महायुती सरकार पूर्ण ताकतीने पाठीशी उभे आहे असे मत आमदार सचिन पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

केंद्र शासनाच्या एडीएफ योजने अंतर्गत अलिमको या शासनमान्य संचलित एस. आर. ट्रस्ट संस्था रतलाम (मध्यप्रदेश) व पंचायत समिती फलटण यांच्या विद्यमाने पंचायत समिती फलटण येथे तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसविणे शिबिर पार पडले.

सदरील कॅम्पचे उदघाटन आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, माजी नगरसेवक सुदाम (अप्पा) मांढरे, महाराष्ट्र दिव्यांग संघर्ष समितीचे सचिव कृष्णा पवार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष साताराचे शिवालय वारुळे, युवा नेते विक्रम भोसले, भाजप तालुकाध्यक्ष अमित रणवरे, अळजापूरचे सरपंच शुभम नलावडे, युवा नेते नितीन गोडसे, सोमनाथ यजगर, सागर जाधव आदींसह दिव्यांग व्यक्ती बहुसंख्येने उपस्थित होते.

केंद्र व राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींसाठी दिव्यांग अनुदान योजने अंतर्गत रुपये १५००/- प्रत्येक महिन्यासाठी त्यांचे बँक खातेवर ऑनलाईन द्वारे दिले जाते त्यामध्ये काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अनुदान मध्ये प्रत्येक महिन्यांसाठी रुपये १०००/- इतके वाढवून आता या महिन्यांपासून दिव्यांग व्यक्तींसाठी रुपये २५००/- इतके अनुदान मिळणार आहे.


Back to top button
Don`t copy text!