शासनाने हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 10 : लॉकडाऊन केल्यापासून दोन अडीच महिन्यापासून सातारा शहर परिसरातील हॉटेल व्यवसाय बंद आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या हॉटेल व्यावसायिकांनी शासनाचे सर्व निर्देश पाळून व्यवसाय बंद ठेवला आहे.  आता अनलॉक करताना केंद्राच्या निर्देशानुसार इतर राज्यात हॉटेल्स सुरु करण्यात आली असताना महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेली नाही. मात्र, आता या व्यावसायिकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत असून शासनाने हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी हॉटेल असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली.

लॉकडाऊन अनलॉक करताना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार हॉटेल व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे इतर राज्यात नियम, अर्टी, शर्थीनुसार महाराष्ट्र राज्यात परवानगी देणे आवश्यक होते. मात्र तसे झालेले नाही. वास्तविक लॉकडाऊन काळात हॉटेल व्यवसाय बंद राहिल्याने यावर अवलंबून असणाऱया कामगार वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे. अनेक हॉटेल मालक कामगारांना धीर देवून त्यांना मदत करत आहेत. मात्र हे किती दिवस सुरु राहणार असा सवाल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष राजू भोसले यांनी केला आहे.

सध्या हॉटेल व्यवसाय बंद असल्याने पैशाची आवक बंद झाली. त्यामुळे अनेक हॉटेल मालकांची कर्ज खाती एनपीएमध्ये गेली आहेत. कर्जाचे हप्ते न फिटल्याने अनेक समस्या समोर उभ्या राहिल्या आहेत. तर दुसरीकडे नगरपालिकेकडून करवसुलीचा तगादा सुरु आहे. तर हॉटेल्सना व्यवसायिक दराने वीजबिल आकारणी करणे आवश्यक असताना ती इंडस्ट्रीयल पध्दतीने करण्यात येत असून आता व्यवसाय बंद असला तर वीज मंडळाकडून मिनीमम आकारणी सुरुच असून या आर्थिक बाबींचे नियोजन कसे करावे या अडचणीत हॉटेल व्यवसायिक सापडले आहेत. लॉकडाऊनच्या काळात नुकसान झाले असल्याने हॉटेल व्यवसायिकांना या काळातील वीजबिल, घरपट्टीत सवलत द्यावी, अशी मागणी भोसले यांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी निवेदनात केली आहे.

हॉटेल सुरु करण्यास परवानगी दिल्यास आम्ही करोना स्थितीत आवश्यक असलेली सर्व काळजी घेण्यास तयार असून शासनाच्या नियमानुसार व्यवसाय करु. यामध्ये यामध्ये सकाळी 9 ते 5 ही वेळ दिली असली मूळ हॉटेल व्यवसाय हा जेवणावर चालतो व नागरिक रात्री 7 ते 10 या वेळेत हॉटेलमध्ये येत असतात. त्यामुळे हॉटेलचालकांना रात्री 10 पर्यंत व्यवसायास परवानगी द्यावी, अशी मागणी राजू भोसले यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!