
फुले सुगंधाची किंमत मागत नाही.हवा श्वासाची किंमत ना मागता देते. निसर्गाचा नियम भरभरुन देणे. सारी दुनिया मात्र पैश्याच्या मागे धावत आहे. देणे घेणे हीच संस्कृती वाढीस लागली आहे.
भावनांना ही इथे तराजूत तोलणे असते. आधंळेही पैशाची भाषा बोलतात. डोळसपणे पाहिले तर ही दुनिया सारी मायानगरी. प्रतिष्ठा प्राप्त करून स्वतःला सिद्ध करण्यासाठी वाटेल ते करायला बसली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात चला, प्रेम तर सर्वत्रच मोफत आहे.
निसर्ग संताची भूमिका जपतो. आयुष्यात हेच खरे आहे. हे जगण्याच्या पद्धतीवर अनुभवातून सिध्द होते.