‘हिंदी दिन-2020’ चे औचित्य साधत चित्रपट विभाग राजभाषेवरील चित्रपट दाखविणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.१४: 4 सप्टेंबर 1949, ला भारताने त्याची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा अवलंब केल्याच्या ऐतिहासिक प्रसंगाचे औचित्य साधत, संशोधित माहितीपट प्रसारित करून चित्रपट विभागातर्फे 14 सप्टेंबर 2020 रोजी ‘हिंदी दिन’ साजरा करण्यात येणार आहे. संपूर्ण आठवडा www.filmsdivision.org/Documentary आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision वर हिंदीतील पाच चित्रपट विनामुल्य पाहण्यासाठी उपलब्ध असतील. 

हजारी प्रसाद द्विवेदी, मैथिली शरण गुप्ता आणि काका कालेलकर यांच्यासारख्या दिग्गजांसोबत हिंदीच्या बाजूने लढा देणारे प्रसिद्ध हिंदी विद्वान लेखक व्योहार राजेंद्र सिंहा यांच्या अग्रणी प्रयत्नांमुळे 14 सप्टेंबर 1949 रोजी सिन्हा यांच्या 50 व्या वाढदिवसाच्या दिवशीच भारतीय राज्यघटनेने भारतीय संविधान संघटनेची अधिकृत भाषा म्हणून हिंदीचा स्वीकार केला. 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना लागू झाली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 343 नुसार देवनागरी लिपीमध्ये लिहिलेल्या हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारले गेले. आज हिंदी ही जगातील मोठ्या प्रमाणावर बोलली जाणारी भाषा असून 520 दशलक्षाहून अधिक लोकांची प्रथम भाषा आहे.

या चित्रपटांमध्ये आमच्या संविधानाचे साक्षीदार (संविधान के साक्षी) ( 44 मि. / रंगीत/ हिंदी / 1992) ज्यात संविधान सभा बैठकीचे आणि 14 सप्टेंबर 1949 रोजी रोजी हिंदीला राजभाषा बनविण्याच्या निर्णयाचे मनोरंजक पैलू दर्शवितात, हिंदीला राष्ट्रीय भाषा म्हणून स्वीकारण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम मुलांकडून केलेले चित्रण, भारत की वाणी (52 मि. / रंगीत/ हिंदी / 1991),हिंदीचे महत्त्व जाणण्यासाठी विविध राज्यांमधील प्रवास वर्णन, हमारी भाषा (4 मि./ रंगीत/हिंदी/ 2011), देशाला एकसंघ ठेवणारी राष्ट्रीय भाषा हिंदी, भारतातील हिंदी भाषेचा विकास आणि स्थिती यावर आधारित हिंदी की विकास यात्रा (10 मि. /रंगीत/हिंदी / 2000), या चित्रपटांचा समावेश आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!