पिंप्रद येथे बापानेच केला मुलाचा खून

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २९ : लग्नाची पहिली बायको असतानाही दुसरी बरोबर लग्नाची गाठ बांधल्याचा कारणावरून पारधी समजातील वडिलांनी कुर्हाडीचे घाव घालून पोटच्या पोराचा खून केल्याची घटना पिंप्रद ता. फलटण येथे घडली आहे. सदर घटनेतील आरोपी सिकंदर काळ्या तथा डिसमुख भोसले यास पोलिसांनी गुन्ह्यानंतर दोनच तासात अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता शुक्रवार दि. ३० एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या बाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कि, सुरज सिकंदर भोसले वय ३० रा. पिंप्रद याने पहिली बायको असतानाही दुसरी बायको येडाबाई हिच्याबरोबर लग्नाची गाठ बांधल्याने त्याचे वडील सिकंदर काळ्या तथा डिसमुख भोसले रा. पिंपरद यांच्या मनात सुरज याच्या विषयी राग होता. मंगळवार दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गावातील वडरी आळीतील राहत्या घरासमोर सिकंदर भोसले याने त्याचा मुलगा सुरज भोसले याच्यावर कुऱ्हाडीने डोक्यात व पायावर वार केले. या मध्ये सुरज हा मृत पावला. तसेच त्याची पत्नी दामिनी हिस जीवे मारण्याची धमकी दिली. या बाबतची फिर्याद मयत सुरज भोसले याची पत्नी दामिनी भोसले वय २५ रा. पिंप्रद हिने दिली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच दहिवडीचे पोलीस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!