दैनिक स्थैर्य | दि. २३ सप्टेंबर २०२३ | फलटण |
सोनवडी (खुर्द) येथे कृषी महाविद्यालय, फलटण येथील कृषीदूतांनी फळबाग लागवडीसाठी वापरली जाणारी चौरस पध्दतीच्या आखणीची माहिती शेतकर्यांना दिली.
फलटण तालुक्यातील सोनवडी (खुर्द) येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी संलग्न, फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषि महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी ग्रामीण जागरूकता कृषि कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत फळबाग (आंबा) लागवडीसाठी वापरली जाणारी चौरस पध्दतीची माहिती शेतकर्यांना दिली.
यावेळी कृषीदूत केदार घनवट, भूषण गायकवाड, शुभम कोकणे, अंगद कागणे, शुभम आडके, दुर्वेश बोराटे, गणेश कोळेकर यांनी चौरस पद्धतीने आखणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी सोनवडी (खुर्द) गावचे नागरिक उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितीशा पंडित आणि प्रा. संजय अडात यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.