फिनटेकमुळे बदलतोय शेअर बाजाराचा चेहरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.२१: मागील दशकातील सर्वात मोठा फॅक्टर म्हणजे फिनटेक. जगातील तंत्रज्ञानाच्या लाटेत निर्माण झालेल्या आधुनिक क्षेत्रापैकी हे एक आहे. तंत्रज्ञान आधारीत स्टार्टअप्ससाठी फिनटेक या उदयोन्मुख क्षेत्राने अविश्वसनीय प्रयोग केले आहेत. बँकिंगपासून गुंतवणुकीपर्यंत, या घटकाने आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. आता गुंतवणुकदारांना शेअर बाजारात सहभागी करून घेण्यात ते खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

अनेक फिनटेक बिझनेस सामान्य गुंतवणूकदारांना सुविधा प्रदान करतात. यात यूझर फ्रेंडली यूझरचा एक्सचेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) पोर्टफोलिओ व्यवस्थापित करणारा एआयआधारीत प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांची उद्दिष्टे आणि जोखीमीच्या क्षमतांनुसार सुविधा पुरवल्या जातात. इतर सुविधांमध्ये काही अॅप्स फ्री बेसिक स्टॉक ट्रेडिंग, रिअल-टाइम, प्रासंगिक, वैयक्तिकृत वित्तीय बातम्या आणि जिथे गुंतवणूकदार अखंडपणे स्टॉक खरेदी व विक्री करू शकतात, इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे फिनटेकने शेअर बाजाराचे लोकशाहीकरण केले असे म्हणता येईल. याबद्दल विस्ताराने सांगत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी श्री प्रभाकर तिवारी.

१. याचे लोकशाहीकरण होऊ शकते: यापूर्वी रिटेल गुंतवणूकदारांना ताजा ट्रेंड पाहण्यासाठी किंवा आवश्यक डेटा मिळवण्यासाठी स्टॉक रिसर्च कंपनीला सबस्क्राइब करावे लागत होते किंवा स्टॉक ब्रोकरला पैसे द्यावे लागत होते. मात्र फिनटेकने चांगल्या हेतूसाठी ही पद्धतच बदलली. फिनटेकने रिटेल गुंतवणुकदारांना अल्गोरिदम आधारीत सेवा निवडण्याची सुविधा दिली. याद्वारे बाजाराचा चातुर्याने अंदाज घेता येतो. तसेच गुंतवणुकीवर जास्तीत जास्त परतावा मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेता येतो.

एकाच वेळी एक अब्जाहून अधिक डेटा पॉइंट्सचे विश्लेषण करणारे, नियम आधारीत गुंतवणूक इंजिन इत्यादी नवीन सोल्युशन्सद्वारे डेटा विश्लेषण सर्व लोकांसाठी खुले केले गेले. अगदी काही वर्षांपूर्वी, योग्य गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी गुंतवणूकदारांना काही महिने घालवावे लागत होते. अशा प्रकारच्या सोल्युशन्सच्या प्रवेशामुळे, बिग डेटा अॅनालिटिक्सचा वापर, एआय व मशीन लर्निंग तंत्रज्ञानाने ही प्रक्रिया सोपी केली व गुंतवणुकदारांना काही सेकंदात प्रासंगिक डेटा उपलब्ध झाला. याच वेळी गुंतवणूकदार इन्व्हेस्टर एज्युकेशन प्लॅटफॉर्मद्वारे विनाशुल्क, मजेदार शिक्षण पद्धतीद्वारे शेअर बाजारातील छक्के-पंजे शिकू शकतात. पूर्वी अगदी मोजक्याच गुंतवणूकदारांना अल्गोरिदम ट्रेडिंग आणि ताजे चार्ट्स उपलब्ध होते. आता, फिनटेक ब्रोकर्सच्या एआय आधारीत दृष्टीकोनामुळे अशा प्रकारच्या अत्याधुनिक सेवा सर्वांसाठी सहज उपलब्ध झाल्या.

२. प्रक्रिया सुलभ करण्यात भूमिका: फिनटेक्सनी गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ केली. तर ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतागुंतीचे ट्रेडिंग फॉर्म न भरता शेअर्स खरेदी आणि विक्रीच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. गुंतवणूकदार सहजपणे शेअर्स सांगू शकतात, त्यांना हवे ते शेअर्स हव्या तितक्या संख्येत खरेदी करू शकतात. काही टच आणि स्वाइपद्वारे फिनटेक प्लॅटफॉर्मनी त्यांना हे व्यवहार शक्य करून दिले आहेत.

यासोबतच, गुंतवणूकदारांना कामे करता करता, स्टॉक्सच्या शिफारशी आणि टिप्स मिळवता येतात. अॅपआधारीत ट्रेडिंगमुळे त्यांना येणाऱ्या संधींचा लाभ घेता येतो तसेच आपली कामे करताना शेअर्समधून बाहेरही पडता येते. नव्या फिनटेक आधारीत दृष्टीकोनामुळे, एकाच सोप्या इंटरफेसवर सर्वकाही एकवटले. या सुव्यवस्थित प्रक्रियेत, यूझर्स अधिक वेगाने, सुलभतेने आणि मूल्यानुसार कार्यक्षमतेने गुंतवणूक करू शकतात.

३. कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग: फिनटेक मशीन लर्निंग, चॅटबॉट्स आणि कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय)चा वापर करते. याद्वारे मोठ्या प्रमाणावरील डेटाचे विश्लेषण करून वैयक्तिकृत गुंतवणूक सल्ला देणारे ऑटोमॅटिक सल्लागार तयार केले जातात. याद्वारे किती गुंतवणूक करावी, गुंतवणुकीत विविधता कशी आणावी आणि विशिष्ट गुंतवणुकदाराचा आदर्श पोर्टफोलिओ कसा असावा याची सर्व उत्तरे मिळतात.

तंत्रज्ञानामुळे मालमत्तेचे वितरण तसेच यासोबत येणाऱ्या सेवांचे री-बॅलेंसिंग होते. परिणामी गुंतवणूक अधिक लाभदायक होते. आज, फिनटेक आधारीत ब्रोकर्स एआय आणि एमएलचा वापर करून ग्राहकांच्या नोंदणीसह विविध प्रक्रिया सहज पार पाडतात. यामुळे कोणतीही व्यक्ती ५ मिनिटांच्या आत ट्रेडिंग सुरु करू शकते.


Back to top button
Don`t copy text!