राम गीतांनी सजली समर्थ सदनातील संध्याकाळ

बुधवारी अमित द्रविड यांचे सुश्राव्य गायन होणार


स्थैर्य, 3 जानेवारी, सातारा : भगवान पुरुषोत्तम श्रीरामाची विविध भजने अतिशय सुरेखपणे सादर करीत पुणे येथील सौ. प्रीती करंदीकर व सहकलाकारांनी सातारच्या समर्थ सदनातील संध्याकाळ अविट रामभक्तीच्या गायनाने सुश्राव्य केली. दासनवमी उत्सवानिमित्त श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या श्री समर्थ सदन, संत ज्ञानपीठ संस्कृतीक केंद्रात या उत्सवाचा प्रारंभ पुणे येथील सौ. प्रीती करंदीकर , सौ. आरती सिन्नरकर
, नवीन आगरखेडकर या सहकलाकारांनी सुमारे दोन तास तब्बल रामरायाची 16 भजने व अभंग सादर करून उपस्थित सातारकरांना एक अविट गीतांच्या कार्यक्रमाचा अनुभव दिला.

आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करंदीकर यांनी ..वक्रतुंड महाकाय.. या श्लोकाने करीत समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या.. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा.. अतिशय सुरेख सादर केले. त्यानंतर ..अंतरी माझ्या,.. श्री रामचंद्र कृपालु भजन ..सादर होऊन.. सद्गुरु नाथा हात जोडतो.. सादर झाली. पंढरपूरच्या पांडुरंगाचे ..बोलावा विठ्ठल ..सादर होऊन.. राम का गुणगान करी ..हे हिंदी भजन अतिशय आळवत उपस्थित सातारकर रसिक श्रोत्यांना आपल्या गायकीचा अनुभव दिला. त्यानंतर.. सुंदर ते ध्यान,.. सादर होऊन ..प्रणाम घ्या आमचा ..टाळ बोळे चिपळीला.. सादर होऊन समर्थांचे ..आनंदवनभूवनी ..सादर झाले .मोगरा फुलला ..सादर होऊन. रुणु झुणू रे भ्रमरा.. अतिशय सुरेखपणे कलाकारांनी म्हटले.. श्री राम राम हे म्हणा.. सादर होऊन ..आकार ,उकार, मकार.. या पदाचे सादर करताना उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा गजर केला .विश्वाचा विश्राम रे ..सादर होऊन ..कानडा राजा पंढरीचा.. यावेळी सादर होऊन ..नादातून या नाद निर्मितो श्री राम जय राम जय जय राम ..ने या रंगलेल्या गायन कार्यक्रमाची सांगता झाली .

या सर्व कलाकारांचा सत्कार समर्थ सेवा मंडळाच्या वतीने जेष्ठ समर्थ भक्त रमेश बुवा शेंबेकर रामदासी यांच्या हस्ते करण्यात आला .कार्यक्रमास मोठ्या संख्येने सातारकर उपस्थित होते.

दरम्यान बुधवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता सातारा येथील स्थानिक कलाकार अमित द्रविड यांचे सुश्राव्य गायन सादर होणार असून यावेळी त्यांना संवादिनी साथ बाळासाहेब चव्हाण यांचे असून तबल्यावर साथ भानुदास ओतारी करणार आहेत.


Back to top button
Don`t copy text!