जागतिक कसोटी क्रिकेट स्पर्धेत समीकरण बदलले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, दि.10: इंग्लंडविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) कडे जाण्याचा मार्ग खडतर झाला आहे. इंग्लंडने या विजयासोबत WTC च्या गुणतालिकेत टॉपवर पोहोचली आहे. तर भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.

भारताला आता या मालिकेच्या उर्वरित 3 पैकी किमान 2 सामन्यांत विजय मिळवावा लागले. भारत जर एकही सामना गमावला तर फायनलच्या शर्यतीतून बाहेर होईल. दुसरीकडे इंग्लंडला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी किमान 3 सामने जिंकणे आवश्यक आहे.

WTC च्या फायनलमध्ये न्यूझीलंडचे स्थान पक्के

या निकालामुळे ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये जाण्याची आशाही वाढली आहे. ऑस्ट्रेलियाचे भविष्यही भारत-इंग्लंड मालिकेवर अवलंबून आहे. इंग्लंड ही मालिका 1-0 ने जिंकल्यास ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडबरोबर अंतिम सामन्यात खेळेल. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंडची फायनलमधील जागा पक्की झाली आहे. यावर्षी जूनमध्ये लॉर्ड्स येथे चॅम्पियनशिपची अंतिम लढत होणार आहे.

भारत-इंग्लंड मालिकेच्या 9 संभाव्य निकालांच्या आधारे कोणते दोन संघ अंतिम फेरी गाठतील हे जाणून घ्या

भारत-इंग्लंडचा संभाव्य मालिका निकाल पॉइंट % वर परिणाम कोणते संघ WTC फायनल खेळतील
1. जर भारत 3-1 जिंकला भारताचे 72.22% आणि इंग्लंडचे 61.38% होतील भारत VS न्यूझीलंड
2. जर भारत 2-1 जिंकला भारताचे 69.44% आणि इंग्लंडचे 62.77% होतील भारत VS न्यूझीलंड
3. जर मालिका 2-2 / 1-1 अशी बरोबरीत सुटली तर भारताचे 68.05% आणि इंग्लंडचे 65.55% होतील ऑस्ट्रेलिया VS न्यूझीलंड
4. जर इंग्लंड 1-0 जिंकला इंग्लंडचे 65.55% आणि भारताचे 63.88% होतील ऑस्ट्रेलिया VS न्यूझीलंड
5. इंग्लंड 2-0 जिंकला इंग्लंडचे 68.33% आणि भारताचे 62.5% होतील ऑस्ट्रेलिया VS न्यूझीलंड
6. इंग्लंड 2-1 ने जिंकला इंग्लंडचे 66.94% आणि भारताचे 65.27% होतील ऑस्ट्रेलिया VS न्यूझीलंड
7. इंग्लंड 3-0 ने जिंकला इंग्लंडचे 71.11% आणि भारताचे 61.11% होतील इंग्लंड VS न्यूझीलंड
8. इंग्लंड 3-1 ने जिंकला इंग्लंडचे 69.72% आणि भारताचे 63.88% होतील इंग्लंड VS न्यूझीलंड
9. इंग्लंड 4-0 ने जिंकला इंग्लंडचे 73.88% आणि भारताचे 59.72% राहतील इंग्लंड VS न्यूझीलंड


Back to top button
Don`t copy text!