स्थैर्य, फलटण : फलटण शहराच्या स्मशानभूमी जवळ एक फिनोलेक्स कंपनीचे पाईप पुण्यावरुन घेवुन तामीळनाडू राज्यामध्ये जात असलेला आयशर टेम्पो क्र. AP-39/T-3755 हा दोन दिवसापूर्वी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमार पलटी झाला. त्यामध्ये सुदैवाने जिवितहानी अथवा मोठे नुकसान झाले नाही. सदर गाडीमध्ये चालक दिनुरदास इरुलाकल्ली रा.अनंतपूर, आंध्रप्रदेश हा एकटाच होता. रात्र गस्तीवरील फलटण शहरचे पोलीस कर्मचारी यांनी सदर ठिकाणी बंदोबस्त ठेवला व वाहतूक रात्रीच्या वेळी नियंत्रीत केली. सकाळी क्रेनच्या साहय्याने वाहन बाजूला करुन माल भरण्यात आला. अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी दिली.
सदर ठिकाणी नवीन चालकाला रस्त्याचा अंदाज येत नाही. मागील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ४ ते ५ अपघात झाले आहेत. त्यामुळे सदरची जागा अपघाताकरीता ब्लॅक स्पॉट झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय सोलापूर येथे आहे. सदर ठिकाणी रावरामोशी पुला सारख्या रेडीयमचे दिशा-दर्शक बोर्ड बसविणे आवश्यक आहे. तसेच रम्बलर बसविणे आवश्यक आहे, असेही फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांनी स्पष्ट केले.