स्थैर्य, लोणंद, दि.२: फलटण तालुक्यातील सालपे घाटाचा चढ सुरू होतानाच अज्ञात पाच जणांनी एका ट्रकला दुचाकी आडवी मारून थांबवला. चालकास मारहाण करुन हातपाय बांधून ट्रक घेवून पोबारा केला. यवत, ता. दौंड येथे ओढ्याजवळ सोडून चालकास सोडून ट्रक व ट्रकमधील सामान असा 33 लाखांचा मुद्देमाल घेऊन घेवून चोरटे निघून गेले. या घटनेची लोणंद पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे.
याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, सालपे, ता. फलटण गावच्या हद्दीत ट्रकचालक सचिन माणिक कोळी, रा. आचकन हल्ली, ता. जत, जि. सांगली हे ट्रकमधून (एमएच 09 सीयू 9823) या ट्रकमधून विजय स्टील ट्रेडर्स या कंपनीचे हांडेवाडी यांचे लोखंडी पाईप घेऊन विशाल स्टील टी व्ही केंद्राचे पलीकडे कोल्हापुर रोड सांगली येथे डिलीव्हरी देणेसाठी चालले असता दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास सालपे घाट येथे तीन इसमांनी मोटारसायकल वरुन येऊन ट्रकला मोटारसायकल आडवी मारून ट्रक थांबवला. यानंतर आणखी दोघेजण तेथे आले. ते पाठीमागून येऊन सर्वजण ट्रकमध्ये घुसले. त्यांनी ट्रक ड्रायव्हर यास आरडाओरडा करु नको असे म्हणून हाताने मारहाण केली व हातपाय तसेच दंडास दोरीने बांधून ट्रकच्या केबिनमध्ये ठेवले. रात्री यवत येथे कुठल्या तरी ओढ्याजवळ टाकून ट्रक व ट्रकमधील माल लोखंडी अँगल चॅनल असा एकूण 32 लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.
या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस या पाच जणांचा कसून शोध घेत आहेत. तपास हवालदार सपकाळ करत आहेत.