चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कंटेनर पुलाच्या भरावावरून कोसळला


दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२२ । सातारा ।  नागठाणे (ता.सातारा) येथे भरधाव वेगाने निघालेल्या कंटेनर ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो उरमोडी नदीच्या पुलावरील भरावावरून खाली कोसळला. मंगळवारी पहाटे हा अपघात झाला. पहाटे कराड बाजूकडून साताराकडे भरधाव वेगाने निघालेला कंटेनर ट्रक हा नागठाणे गावच्या हद्दीतील उरमोडी नदीपुलावरुन जात असताना चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटला. यावेळी नदी पुलाच्या अलीकडे पुढे असलेल्या भुयारी पुलाच्या तोंडाजवळ सुमारे ५० फूट खाली कोसळला व पलटी झाला.या अपघातात ट्रकमधील दोघे (नाव व गाव समजू शकले नाही) जखमी झाले.या अपघातांची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे हवालदार विजय देसाई व उत्तम गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली.रात्री उशिरापर्यंत या तीनही अपघातांची नोंद करण्याचे काम सुरू होते.


Back to top button
Don`t copy text!