
दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । मुंबई । मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली आहे या शब्दांत सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी प्रेमा किरण यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
शोकसंदेशात मंत्री श्री. देशमुख यांनी म्हटले आहे की, १९९० च्या दशकामध्ये अनेक चित्रपटांमध्ये प्रेमा किरण यांनी नायिकेच्या भूमिका केल्या आणि त्या भूमिका गाजल्या होत्या. धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी अशा विविध चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका विशेष लोकप्रिय ठरल्या. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण होईल, असेही सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.