
स्थैर्य, सातारा दि.३: मराठयांची राजधानी असलेल्या साताऱ्यात ३५ लाखांचा मोर्चा निघाला होता त्याला 4 वर्षे पूर्ण झाल्याने मराठा क्रांती मोर्चा राजधानी साताऱ्याच्यावतीने आठवणी जागवल्या. दरम्यान, एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी अशी घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी मराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उत्तरप्रदेश येथील हाथसर येथील अत्याचार युवतीला श्रद्धांजली वाहण्यात आली.
राजधानी साताऱ्यात ना भूतो ना भविष्यती असा ३५ लाखाचा भव्यदिव्य मोर्चा निघाला होता. त्याला शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी ४ वर्षे पूर्ण झाली असल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आठवणींना उजाळा देण्यात आला. सध्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा अद्यापही लढा सुरु आहे. मराठा क्रांती मोर्चा राजधानी साताऱ्याच्या पदाधिकाऱ्यांनी पोवई नाका या शिवीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी जय भवानी, कोण म्हणतंय देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही. अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोवई नाका परिसर दणाणून गेला. दरम्यान, उत्तरप्रदेश मधील हाथसर येथील अत्याचार झालेल्या १९ वर्षाच्या मनीषा वाल्मिकी या युवतीला श्रद्धांजली वाहण्यात आली.