जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
स्थैर्य, फलटण : जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार दिनांक 17 जुलै ते 22 जुलै दरम्यान जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याने दिनांक 16 रोजी फलटणची बाजारपेठ चांगलीच हाऊसफुल्ल झाल्याचे पहायला मिळाले. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.
शहरातील गजानन चौक, शंकर मार्केट परिसर, गिरवी नाका आदी ठिकाणी भाजीपाला, किराणामाल खरेदीसाठी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. मेडिकल दुकाने, बँकां आदी ठिकाणीही गर्दी पहायला मिळाली. एकाच दिवशी शहरात झालेली मोठी गर्दी पाहून अशी गर्दी म्हणजे ‘कोरोना’च्या फैलावाला फलटणकर आणखीन निमंत्रण देत आहेत तसेच या गर्दीमुळे लॉकडाऊन यशस्वी ठरेल कां? अशी चर्चा अनेक ठिकाणी होत होती.