भाजपचे नेतृत्व छोट्या जातीकडे गेल्यामुळे क्रांतीचे चक्र पूर्ण – शिवाजीराव शिंदे 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ मार्च २०२३ । दहिवडी । भारतीय जनता पक्ष फक्त राजकीय पक्ष नसून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेणारे संरक्षण कवच आहे. भाजपचे नेतृत्व छोट्या जातीकडे गेल्यामुळे युगपुरुषांच्या अपेक्षित विचारांचे क्रांतीचे चक्र पूर्ण झाले असा विश्वास भाजपचे नेते तथा माण भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे,भाजप युवा मोर्चाचे नेते सुनील  काळेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

केंद्र व राज्य सरकार मधील भारतीय जनता पक्ष व रिपब्लिकन, लोकजनशक्ती व इतर समविचारी मित्र पक्ष वेगवानपणे निर्णय घेत आहेत. देश व राज्याच्या गतिमानतेमध्ये जगात नावलौकिक प्राप्त केला आहे. विज्ञान व अध्यात्म हा जीवनाचा आयुष्य भाग आहे .तसेच सर्व जाती धर्माचे संरक्षण करणे हा भारतीय जनता पक्षाचा विचार आहे. हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व जाती समूहाने प्रयत्न केले आहेत.

सातारा जिल्ह्यामध्ये भाजपने खूप मोठी मजल मारलेली आहे.सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,अध्यात्मिक क्रांती झाल्यानंतर खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये भाजपने स्थान निर्माण केले आहे.  माण- खटाव तालुक्यामध्ये काही भ्रष्ट अधिकारी व वाळू माफिया यांना संरक्षण देण्यासाठी अनेकांचे हात सरसावले होते. त्याला जाय बंद करण्यासाठी महाराष्ट्राचे विधिमंडळ सभागृहात आ. गोरे यांनी आवाज उठवला. वाळू उपसा करण्यासाठी बोगस बारकोड पावती व त्यातून मिळणाऱ्या पैशातून राजकारण या फेऱ्यातून आता माण- खटावच्या जनतेला मुक्त करण्याचा विडा बहुजन जलनायक आ. गोरे यांनी उचललेला आहे.

नुकत्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात रामोशी, गुरव, वडार, लिंगायत अशा छोट्या छोट्या जातींची महामंडळ स्थापन करून खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवण्याचा अनुभव या छोट्या जातींना लाभला आहे. त्यामुळे इतर पक्षांची अवस्था हे अस्थिपंजर झाल्यासारखे झालेले आहे. सध्या महागाई, शेतकऱ्यांचे पिकांचे होणारे नुकसान, बेरोजगारी ,विविध शासकीय कर्मचारी यांना मिळणारा मोबदला याबाबत भाजपच प्रश्न सोडवू शकतो. याची आता जनतेला खात्री पटली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता भाजपने गुढी उभारले असून त्यामध्ये छोट्या-मोठ्या जातींना स्थान मिळत आहे. हे आनंदाची बाब आहे. लोकशाहीमध्ये फार काळ लोकांना फसवता येत नाही. लोकशाहीमध्ये सत्ता स्थापन करताना व्यापक विचार करूनच निर्णय घेतले जातात. जनतेचा आवाज म्हणून भाजप सत्तेत सहभागी झाले आहेत. याचा काही ना विसर पडला असला तरी  संसदीय कामकाजामध्ये भाजपने गरुड झेप मारलेले आहे. सत्ता नसल्यामुळे अस्वस्थ झालेले काही विरोधक दोन्ही सभागृहात कामकाज होऊ देत नाही. अजूनही त्यांची मानसिकता बदलत नाही. तोपर्यंत सर्व जाती धर्माच्या लोकांना भाजप आपला पक्ष वाटू लागला आहे. असेही श्री शिवाजीराव शिंदे यांनी नमूद केलेले आहे.

सातारा जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री अशोक गायकवाड, रा. स. प.जिल्हाध्यक्ष श्री श्रीकांत देवकर यांच्या नेतृत्वाखाली नव्या उत्साहाने आणि चैतन्याने मतदार संघाचा विकास होत आहे. या दैदिप्यमान विकासामुळे एकेकाळी घराणेशाही बळकट करण्यासाठी स्वबळाचा नारा देत होते. आता त्यांना ही भाजप पक्षात येण्याची घाई झाली आहे. हा भाजपचा नैतिक विजय आहे. आगामी सातारा जिल्हा परिषद व दहा पंचायत समितीच्या निवडणुकीत छोट्या जातींनाही प्रतिनिधित्व मिळणार आहे. असेही श्री. शिंदे व श्री. काळेकर यांनी स्पष्ट केले आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, राष्ट्रीय राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर व सर्व कार्यकर्त्यांचा अभिनंदन करण्यात आले आहे.  मेळावे, अभ्यास वर्ग, बैठका व शिबीर आणि प्रत्यक्षात भेट घेऊन अनेक मान्यवरांनी भाजपच्या केलेल्या कार्याचे कौतुक केले आहे. भाजपच माण- खटाव मतदार संघात एक नंबरचा पक्ष राहील. असाही विश्वास व्यक्त केला आहे.

या वेळेला सोशल मीडिया संयोजक शेखर पाटोळे, भाजप महिला तालुकाध्यक्ष वृक्षाली रोमण, श्रीमती गीता लोखंडे, जेष्ठ नेते शशिकांत पाटोळे,डॉ. वैभव माने, अमोल गोडसे, सोमनाथ जाधव,बनाजी पाटोळे, काका बनसोडे, प्रदीप खुडे, जयवंत पाटील, अनिल माळी, प्रदीप शेटे व रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष कुणाल गडांकुश,योगेश हिरवे, ओमकार चव्हाण,विनय भिसे, पंकज जोशी आदी कार्यकर्त्यांनी भाजप पक्षाच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी एका विचाराने प्रयत्न करण्याच्या दृष्टीने लवकरच संकल्प मेळावा माण- खटावच्या भूमीत होणार असल्याची ही माहिती यावेळी देण्यात आली. छुपा जातीयवाद तोडो सच्च्या दिल से भाजप से नाता जोडो असा अभिनव नारा भाजप समर्थक देऊ शकतात. अशी उत्कृष्ट कामगिरी भाजप करीत असल्याचे मत अमोल कांबळे, श्रीधर गोळे, करण पोरे व संतोष भंडारे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!