फलटणच्या रेल्वेसहित तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व विकासकामांचे श्रेय हे रामराजेंचेच; खासदार रणजितसिंह यांची उपरोधिक टोला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२३ | फलटण | फलटण तालुक्यामध्ये जी विकासकामे हि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत. मग त्यामध्ये फलटणची रेल्वे असो किंवा नीरा देवधर, राष्ट्रीय महामार्गाची जी कामे सुरु आहेत. त्यासोबतच आगामी काही काळामध्ये जी कामे सुरु होणार आहेत. या सर्वांसोबत फलटण तालुक्यासह जिल्ह्यामध्ये जी विकासकामे सुरु आहेत त्या सर्व कामांचे श्रेय हे विधानपरिषदेचे माजी सभापती व आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचेच आहे, असा उपरोधिक टोला खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लगावला.

फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहाध्यक्ष अमोल सस्ते, माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपूर्ण राज्यात इतर तालुक्याच्या दृष्टीने फलटण तालुका हा आगामी काही काळामध्ये नक्कीच पुढे असणार आहे. मी जनतेच्या दारातून निवडून गेलो आहे; शेवटी जनमतातून निवडून जाणे वेगळे असते आणि विधानपरिषदेवर जाणे वेगळे असते. मला लोकसभेला मिळालेली मते ही आजपर्यंत ज्यांना मते मिळत आहेत; त्यांची सर्व मते एकत्र केली तरी एकूण होणार नाही. खासदारकीच्या निवडणुकीमध्ये फलटण तालुक्यातून मला आघाडी मिळाली होती. नीरा देवधर किंवा अन्य कोणत्याही प्रकल्पाचे श्रेय मी त्यांना द्यायला तयार आहे. त्यांनी केलेल्या टिकेकर उत्तर देण्यास आता मला वेळ नाही. त्यांचे सर्व आरोप स्वीकारण्यास मी तयार आहे. त्यात जर त्यांना आनंद मिळत असेल तर मी त्यांचे सर्व आरोप स्वीकारण्यास तयार आहे; त्यांच्या दुःखामध्ये मी सामील आहे; असेही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.

कलम 372 बाबत नक्की कोण काय बोलत आहे त्याबद्दल मला माहित नाही. परंतु देशामधील असणारे जम्मू व काश्मीर बाबत असणारे कलम 370 रद्द करताना मत देण्याचे भाग्य मला माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेमुळे मिळाले आहे; हे कधीही विसरू शकणार नाही. श्रीमंत रामराजे हे खूप मोठे नेते आहेत. आता जे त्यांना दुःख होत आहे; त्या त्यांच्या दुःखामध्ये मी त्यांच्यासोबत आहे. जर आपण केलेल्या विकासकामांवर आरोप करून त्यांना बरे वाटत असेल तर त्यांचे सर्व आरोप स्वीकारण्यास मी तयार आहे, असेही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.

नाईकबोंमवाडी येथे होत असलेल्या एमआयडीसीमध्ये कोणत्याही कंपनी येणार नाहीत किंवा एवढ्या लांब कोणत्या कंपन्या येणार ? असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. परंतु जेंव्हा सुरवडी येथे जेंव्हा एमआयडीसी झाली होती तेंव्हा तिथे सुद्धा हायवे नव्हता आधी एमआयडीसी होते व नंतर हायवे होत असतो. फलटण तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे सध्या काम सुरू आहे. फलटण तालुक्याच्या सर्व बाजूने राष्ट्रीय महामार्गाचे काम जोरात सुरू आहे. आगामी काळामध्ये नक्कीच होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापासून पासून नाईकबोंमवाडी येथील नूतन एमआयडीसी लांब नसेल. त्यापुढे जाऊन आपण ना. नितीन गडगरी यांना विनंती करून नाईकबोंमवाडीतून आता हायवे नेणार आहोत; त्याला ना. नितीन गडकरी यांनी सुद्धा मान्यता दिली आहे. त्याचे काम काही दिवसामध्ये सुरु होईल. सोलापूर, म्हसवड किंवा सांगोला एमआयडीसी जावू शकते तर नाईकबोंबवाडीत सुद्धा येवू शकते, असेही यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.

यावेळी बोलताना खासदार रणजितसिंह म्हणाले कि, फलटण उपजिल्हा रुग्णालयाचे खाटा वाढवण्याचा प्रस्ताव आपण दिला होता त्यासोबतच सिटी स्कॅनची संपूर्ण यंत्रणा हि उपजिल्हा रुग्णालय येथे उभारण्यासाठी आपण प्रयन्तशील होतो त्याला आता मंजुरी मिळाली आहे. उपजिल्हा रुग्णालयामध्ये अधिकाऱ्यांची जो मुजोरपणा वाढत आहे. अश्या मुजोर अधिकार्यांना फलटणमध्ये आता स्थान नाही आगामी काही महिन्यात अश्या अधिकाऱ्यांच्या बदल्या नक्कीच होतील व अश्या मुजोर अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. फलटण नगरपालिकेत जे कंत्राटे दिली आहेत ती मुद्दाम काही माणसांचा फायदा करण्यासाठी वेगळ्या पद्धतीने कंत्राटे दिले आहेत. आजपर्यंत कोणालाही व्यक्तिगत त्रास देण्याचा आमचा कधीही हेतू नाही किंवा मुद्दामून त्रास देण्याचे काम आम्ही केले सुद्धा नाही. अगदी नगरपालिकेतील तत्कालीन राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यकर्त्याला कधीही त्रास दिला नाही.


Back to top button
Don`t copy text!