देशात आता सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची गरज नाही, केंद्र सरकारचा निर्णय

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१२: देशातील २३ राज्यांसह आठ केंद्र शासित प्रदेशांमधील सरकारी नोकरीसाठी मुलाखतीची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी याबाबतची माहिती दिली आहे. केंद्र सरकारमधील गट ब (विना-राजपत्रित) आणि गट सी दर्जाच्या पदांसाठी भरतीप्रक्रियामध्ये १०१६ पासून मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत, असे कार्मिक मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात जितेंद्र सिंह यांनी असे नमूद केले आहे.

२०१५ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उमेदवाराला मुलाखत देण्याची आवश्यकता नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्यानुसार, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार कार्मिक व प्रशिक्षण विभागाने यासंदर्भात दखल घेतली आणि केंद्र सरकारच्या भरतीमध्ये मुलाखती हटविण्याची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण केली. या योजनेची अंमलबजावणी १ जानेवारी, १०१६ पासून झाली आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

याचबरोबर, सरकारी नोकरीसाठी मुलाखती न घेण्यासंदर्भातील हा नियम गुजरात आणि महाराष्ट्राने अतिशय वेगाने स्वीकारला, तर इतर राज्यांनी लवकरच याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली. मात्र, केंद्र सरकारच्या पाठपुराव्यानंतर आता २३ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुलाखती घेणे बंद केले आहे, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.

मुलाखतीच्या गुणांमध्ये हेराफेरी

निवेदनात म्हटले आहे की, भरती प्रक्रियेत पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी मुलाखतीची प्रक्रिया हटविण्याची ही प्रणाली स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करणा-या उमेदवारांसाठी अत्यंत प्रभावी सिद्ध झाली आहे. अनेकदा नोकरीसाठी मुलाखतीच्या गुणांमध्ये हेराफेरी करण्यात येत होती आणि त्यासाठी मोठी रक्कम मोजली जात होती, असा आरोप ब‍-याच वेळा करण्यात येत होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!