दुधेबावी व्याख्यानमालेच्या परंपरेचे सातत्य गौरवास्पद : सिव्हील सर्जन डॉ. सुभाष चव्हाण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । फलटण । दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानची व्याख्यानमालेच्या परंपरेचे सातत्य निश्चितच गौरवास्पद असून प्रबोधन चळवळ आदर्शवत असल्याचे क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रूग्णालय सातारचे सिव्हील सर्जन डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

दुधेबावी ता.फलटण येथील ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित संत गाडगेबाबा व्याख्यानमालेत डॉ.सुभाष चव्हाण बोलत होते. कार्यक्रमास डॉ.प्रतिभाताई चव्हाण, सोपानराव आटोळे, पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष हणमंतराव सोनवलकर, उपसरपंच भाऊसाहेब मोरे, दुधेबावी सोसायटीचे चेअरमन श्रीमंत नाळे, उद्योजक किरण सोनवलकर, दादा मदने यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.सुभाष चव्हाण म्हणाले ,’ग्रामीण भागात व्याख्यान माला आयोजित करण प्रेरणादायी बाब असून सातत्य ठेवल्याची बाब तर निश्चितच गौरवास्पद आहे’. गेली २० वर्ष जिद्द व चिकाटीने प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांची प्रबोधन चळवळ दिशादर्शक आहे.’ युवकांना,शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रतिष्ठान करत असलेले प्रयत्न मोलाचे आहेत. असे डॉ.सुभाष चव्हाण यांनी स्पष्ट केले.

यावेळी विजयकुमार नाळे, जयवंत तांबे, भानुदास सोनवलकर , सौ. स्वाती नाळे, सौ.रूपाली नाचण, सौ.गिरी, विठ्ल चांगण , डॉ. युवराज एकळ, सचिन सोनवलकर, देविदास घुगरे, कृषी मित्र संजय सोनवलकर, कांता सोनवलकर, सुभाष सोनवलकर, भिमराव नाळे, ह.भ.प.महादेव सोनवलकर, सुधाकर चांगण, संदीप सोनवलकर, सुमीत नाळे, लक्ष्मण सोनवलकर, अक्षय नाळे, राहूल सोनवलकर, धिरज सोनवलकर, अभिजीत सोनवलकर, पोपटराव सोनवलकर यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शशिकांत सोनवलकर यांनी केले. प्रास्ताविक सचिन सोनवलकर यांनी केले. सुत्रसंचालन डॉ. सागर कराडे यांनी केले. आभार विठ्ठल सोनवलकर यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!