स्थैर्य, वावरहिरे, दि.९: सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील कंञाटदाराची कामे पुर्ण असुनही वर्षेभरापासुन कामाची प्रलंबित देयके मिळत नसल्याने कंञाटदार प्रचंड नाराजी आहेत.शासनाने जिल्हा परिषद,बांधकाम विभागाकडे जिल्ह्यातील सर्व कंंञाटदारची रखडलेली देयके लवकरात लवकर अदा करावीत अन्यथा संपुर्ण जिल्ह्यात 25 नोव्हेंबर नंतर संपुर्ण काम बंद आंदोलन करणार असल्याचे जिल्हा कंञाटदार संघटनेचे अध्यक्ष सिंकदर डांगे यांनी सांगितले.कंञाटदाराची बिले रखडल्याने या बिलावर अवलबुंन राहिलेल्या हजारो कामगारांना त्यांची मजुरी,सिंमेट,रेती तसेच इतर साहित्य पुरवणारे विक्रेते यांचे थक्कीत पैसे देण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.त्यामुळे शासनाने दिवाळीपुर्वी थकित बिले अदा करावीत.अन्यथा कंञाटदारांच्या संतापाचा उद्रेक होईल असा इशारा श्री डांगे यांनी दिला.