कोळकीत “एक वॉर्ड, एक गणपती” संकल्पना राबवावी : संदीप नेवसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कोळकी : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसची 13 विविध लक्षणं आतापर्यंत समोर आली आहे. यातली काही लक्षणं नव्याने पुढे आली आहेत. या नव्या लक्षणांबद्दल WHO ने त्यांच्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. जगभरात गेल्या तीन – चार महिन्यांत कोव्हिड-19 झालेल्या रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसली आहेत. कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे तुमच्या दोनपैकी एक लक्षण दिसू लागतं. एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.  मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात.  तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच. तसंच यावेळी घसा लाल होऊन दुखू लागतो. म्हणूनच कोव्हिड-19 ची तपासणी करताना थ्रोट स्वॅब म्हणजेच घशातून घेण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते. अशामध्ये कोळकी गावात प्रत्येक वॉर्ड मध्ये अनेक गणेश उत्सव मंडळे आहेत. ह्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोळकी गावात एक वॉर्ड गणपती संकल्पना राबवावी अशी मागणी कोळकी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संदीप नेवसे यांनी केलेली आहे. 

कोरोनाच्या संसर्गामुळे अनेक गावे आता कोरोना हॉटस्पॉट होत आहेत. त्यात कोळकी तर पहिल्यापासून पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे यावर्षीचा गणेशोस्तव अत्यंत साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. यावर्षी कोळकीत एक वॉर्ड एक गणपती अशी संकल्पना राबवावाी. त्यासाठी त्या त्या वॉर्डातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा. जेथे गणेश प्रतिष्ठापना केली जाईल तेथे प्रत्येक मंडळांना आरती, पुजेसाठी ठराविक दिवस वाटून द्यावेत. प्रशासनाने पण याबाबत गांभिर्याने विचार करावा व संभाव्य संकट हाताने ओढवून घेण्यापेक्षा ते टाळावे असेही संदिप नेवसे यांनी स्पष्ट केले.  

कोळकी गावामध्ये भौगोलिक दृष्टया एक गाव एक गणपती हे शक्य नाही. त्या मुळे एक वॉर्ड, एक गणपती अशी संकल्पना राबवता येईल. सध्या कोरोनाच्या काळात कोळकी गावामध्ये बहुतांशी रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे गणपती कालावधीमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एक गाव एक गणपती ऐवजी कोळकीमध्ये एक वॉर्ड, एक गणपती ही संकल्पना राबविण्यात यावी असेही संदीप नेवसे यांनी स्पष्ट केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!