श्रीमंत राजे बंधूंच्या विकासकामांच्या पाठीशी फलटणनगरी ठामपणे उभी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२१ | फलटण | ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’ या उक्तीप्रमाणेच फलटण संस्थानचे अधिपती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभेच्या पहिल्याच विजयी मेळाव्यात फलटण – खंडाळ्याच्या जनतेला धोम – बलकवडीचे पाणी आणणारच या दिलेल्या आश्‍वासनाची कार्यपूर्ती करुन दाखविली. या पाण्यामुळे कृषीक्रांती घडवून शेतकर्‍यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन तर झालेच शिवाय आज वाखरी, ढवळ परिसरात ऊस पिकाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ होवून शेतकर्‍यांच्या विहीरीचे पाणी आता आटतच नाही. हे परिवर्तनाचे चित्र पाहून आपल्या मागील पिढ्यांच्या विकासकामांचा आदर्श श्रीमंत रामराजेंनी पुढेही चालवून दाखवला आहे, असेच म्हणावे लागेल.

फलटण संस्थानचे भूतपूर्व अधिपती कै.श्रीमंत मुधोजीराजे नाईक निंबाळकर व कै.श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या कारकीर्दीत शिक्षण, सोयी-सुविधा, पाणीपुरवठा, शेती आदींच्या प्रगतीसाठी अनेक दूरगामी कार्यक्रम राबवले. कै.श्रीमंत मुधोजीराजे यांनी संस्थानातील नागरिकांना शिक्षण देता यावे म्हणून सन 1875 साली शिक्षण संस्थेची स्थापना केली. तसेच कै.श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन बांधकाम मंत्री असताना जागतिक बँकेचे कर्ज काढून कोयना धरणाचे भूमीपूजन करुन काम पूर्ण केले. या प्रकल्पामुळे संपूर्ण महाराष्ट्रात वीज पोहचली शिवाय कृषी औद्योगिक क्रांतीची सुरुवातही त्यांनी करुन दिली. एवढेच नव्हे तर स्वतंत्र भारतात पहिले संस्थान विलीन करण्याचा मानही स्वर्गीय मालोनीराजेंचाच. तसेच त्यांनी संस्थानच्या 100% खर्चातून बाणगंगा धरणाची उभारणी करुन फलटणचा खरा दुष्काळी भाग ओलीताखाली आणण्याचे महान कार्य केले. हाच आपल्या मागील पिढढ्यांचा दर्जेदार व गुणात्मक विकासकामांचा आदर्श श्रीमंत रामराजेंनी डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल सुरु ठेवली आहेे. श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे या शालीन नेतृत्त्वाच्या जोडीची साथ त्यांना या कामासाठी मिळालेली आहे. ही विकासकामांच्या विचारांची त्रिमूर्ती आज फलटणकरांचा स्वाभीमानच म्हणावा लागेल. तर सर्वसमावेशक विचारांचे विद्यमान लोकप्रतिनिधी आमदार दीपक चव्हाण विकासकामांवर तीक्ष्ण नजर ठेवून कार्यमग्न असतात.

श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत शिवांजलीराजे या शालीन जोडीने गोविंद दूध उद्योगामार्फत हजारो बेरोजगारांच्या हाताला चांगल्या प्रतीचा रोजगार दिला, अनेक शेतकरी कुटूंबांचे जीवनमान उंचावले. गोविंदचे व्यवस्थापन अत्यंत शिस्तप्रिय व दूधाला योग्य दर देण्याचे नियोजन यामुळे अनेक शेतकर्‍यांनी दुग्ध व्यवसायातून आपल्या प्रपंचामध्ये आर्थिक परिवर्तन साधले आहे. गोविंदच्या कुशल प्रशासनाचा प्रत्यक्ष फायदा व अनुभव ते घेत असून त्यांची जीवनमान उंचविण्यात गोविींदचाच सिंहाचा वाटा आहे हे सत्य विरोधकांनाही नाकारता येणार नाही. ग्रामीण स्वयंरोजगारासाठी दुग्धव्यवसायच पर्यायी व्यवसाय होऊ शकतो हे चित्र आज शेतकर्‍यांना ग्रामीण गुध सोसायटीमार्फत दिल्या जाणार्‍या व्यवहारातून सिद्ध होते.

श्रीमंत रघुनाथराजेंनी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन संपूर्ण राज्यासाठी एक आदर्शवत बाजार समिती असा नावलौकिक मिळवला आहे. कोरोनाकाळात या बाजार समितीमार्फत राबवण्यात आलेले सार्वजनिक उपक्रम अतिशय उल्लेखनीय असेच आहेत. तालुक्यातील गावोगावी व शहरातील प्रत्येक प्रभागात केलेली नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी असेल, लॉकडाऊनमुळे फलटण शहरात अडकलेल्या परप्रांतियांची पहिल्यांदा निवास व भोजनाची व त्यानंतर त्यांना आपापल्या राज्यात सोडण्याची व्यवस्था असेल, कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सुरु केलेले कोरोना केअर सेंटर असेल; एकूणच अशा एक ना अनेक उपक्रमांच्या माध्यमातून श्रीमंत रघुनाथराजेंच्या नेतृत्त्वाखाली सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम बाजार समितीने कोवीडच्या कठीण परिस्थितीत बजावले हे अभिमानास्पद असेच आहे. शिवाय बाजार समितीच्या आवारात शेतकर्‍यांना अल्पदरात भोजन व्यवस्था, कृषीदेव पेट्रोल पंपांची उभारणी, अत्याधुनिक रुग्णवाहिका, नव्याने सुरु होत असलेला धान्य ग्रेडिंग युनिट प्रोजेक्ट आदी शेतकर्‍यांसाठी लाभदायक योजना श्रीमंत रघुनाथराजे अत्यंत धडाडीने राबवत आहेत.

आज फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण नगरपरिषद, फलटण पंचायत समिती व इतर सर्व शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तालुक्यात विकास योजनांची अंमलबजावणी होताना दिसत आहे. हे केवळ श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे व श्रीमंत संजीवराजे यांच्या प्रशासनावरील पकडीमुळे, सूज्ञ विचारांमुळे व कामे करुन घेण्याच्या पद्धतीमुळेच हे नक्की.

फलटण शहरापुरता विचार केल्यास फलटण नगरपालिका प्रशासनाचे सर्व पदाधिकारी व अधिकारी यांना कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून जीवनावश्यक वस्तू वितरण, मोफत अन्नाचे वाटप, कोरोनाग्रस्तांकरीता उपचार यात युद्धपातळीवर कामे केल्यामुळे साथीचे थैमान थोड्याच दिवसात आटोक्यात आणण्यात यश आले. खुद्द फलटण संस्थानच्या राजकन्या व ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी वयोवृद्धांना कोेरोना लसीकरणासाठी प्रत्यक्ष संपर्क करुन प्रवृत्त केले. कोरोनाग्रस्त रुग्णांना तातडीने योग्य उपचार मिळण्यासाठी श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या मार्फत विशेष प्रयत्न केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना मोफत औषधे देण्याच्या उपक्रमातही त्या अग्रभागी राहिल्या. शिवाय संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेवून लहान मुलांची काळजी कशी घ्यावी याबाबत जनजागृतीपर छोटेखानी पुस्तकही त्यांनी प्रकाशित केले. नागरिकांना उत्तमोत्तम नागरी सुविधा देण्यासाठी त्या सदैव तत्पर असून महिला शिष्टमंडळाच्या मागणीप्रमाणे शहरातील नामजोशी गार्डन नजिकच्या रस्त्याचे डांबरीकरण त्यांनी कसे आणि किती तत्परतेने केले याचे आम्ही साक्षीदार आहोत. नाना-नानी पार्कमध्ये तर श्रीमंत सुभद्राराजे यांनी जातीने लक्ष घालून या ठिकाणी आधुनिक सुखसोयी त्या उभारत आहेत. भविष्यातील रिंग रोड व परिसराचे आधुनिकीकरण विचारात घेऊन या ठिकाणी विकासकामांना त्यांनी चालना दिली आहे. गोळीबार मैदान परिसरात पर्णकुटी अपार्टमेंटच्या पाठीमागे 10 लाख लीटर पाण्याची टाकी प्रस्तावित केली आहे. यामुळे शहरातील शिवाजीनगर पर्यंत उच्च दाबाने पाणी देण्यास मदत होणार आहे. फलटण शहरात अनेक भागातील तिसर्‍या व चौथ्या टप्प्यातील तसेच सिमेंट व बिडाच्या पाणी वितरण नलिका बदलण्याच्या प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. रिंगरोड परिसरातील वाढती रुग्णालये व दुकानांची संख्या लक्षात घेऊन डॉ.किरणकुमार नाळे यांच्या रुग्णालयाशेजारील खुल्या जागेत डबल पार्किंग त्यांनी मंजूर करुन घेतले आहे. गोळीबार मैदान, बारवबाग आदी ठिकाणी वृक्षारोपण करुन ‘ऑक्सीजन पार्क’ निर्मितीच्या कार्याला श्रीमंत सुभद्राराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झालेली आहे. एकूणच आधुनिक तंत्रज्ञान वापरुन फलटण शहरात विकासकामांचे नियोजनबद्ध कार्यक्रम सुरु आहेत. यामध्ये भुयारी वीजपुरवठा, घरगुती स्वयंपाकाच्या गॅसचे पाईपलाईनद्वारे घरोघरी वितरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा 24 तास पुरवठा, अग्नीशमनाची आधुनिक व्यवस्था, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी शहरातील विविध प्रभागांत डिजीटल लायब्ररी उभारुन विद्यार्थीनींसाठी विशेष सुविधा देणे आदी नवनवीन प्रकल्पांद्वारे फलटणला 21 व्या शतकातले ‘स्मार्ट टाऊन’ बनवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राजे कुटूंबीय करत आहेत.

श्रीमंत रामराजेंच्या धोम-बलकवडीच्या कार्यपूर्ततेबाबत अभिनंदन करताना स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख म्हणाले होते की, ‘‘मला जे पाणी सांगोला भागात न्यायचे होते ते मला 50 वर्षांच्या आमदारकीत जमले नाही. तर ते तुमच्या भागातील पाण्याचे काम श्रीमंत रामराजेंनी अल्पावधीतच पूर्ण केले. अनेक कामांच्या विकासकार्यपूर्तीमुळे श्रीमंत रामराजे हे अल्पावधीतच सातारा जिल्ह्याचे नेतृत्त्व करु लागले ही तुमच्या फलटण नगरीची अभिमानास्पद बाब आहे.’’ अशा शब्दात श्रीमंत रामराजेंबद्दल महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी गौरवोद्गार काढले होते

अजून एक प्रकर्षाने नमूद करावेसे वाटते की, रात्रीच्या वेळी आपण शिरवळ, खंडाळा, लोणंद मार्गे फलटणला येताना औद्योगिक रोशणाईन सजलेली सोनेरी पहाटतच अनुभवत असतो. हा झालेला बदल श्रीमंत रामराजेंच्या दूरदृष्टी विकासकामांच्या विचारातूनच झालेला आहे. आपल्या तालुक्याच्या विद्याविभूषीत नेतृत्त्वात असणारी कामाची धमक व कार्यकुशल कसब पणाला लावून आपल्या फलटण तालुक्याच्या आर्थिक परिवर्तनाला कलाटणी देणार्‍या नगरपालिका व मार्केट कमिटी निवडणूकीत श्रीमंत राजे बंधूंच्या विकास रथाच्याच पाठीशी सर्वजण ठाम राहतील यात शंका नाही. आपले फलटण शहर अल्पावधीतच राज्यातील सुंदर व स्वच्छ फलटण शहर बनणार आहे. हा श्रीमंतांचा विचार धोमबलकवडी प्रमाणेच कार्यपूर्ततेत आणायचा असेल तर सूज्ञ फलटणकर जनता येथून पुढील काळात होवू घातलेल्या सर्व निवडणूकीत राजेबंधूंच्या विकासप्रक्रियेलाच मत देतील असा विश्‍वास वाटतो.

– डॉ.श्रीकांत कृष्णराव मोहिते,
माजी पशुप्रांत, ओंकार गार्डन, लक्ष्मीनगर, फलटण.
मो.9403940761


Back to top button
Don`t copy text!