‘चैतन्य विहार’ गृहप्रकल्पामुळे फलटणकरांना स्वप्नातले घर बांधणे झाले सोपे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ मार्च २०२२ । फलटण । श्री डी अँड जी कॉर्प एल.एल.पी. या रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित कंपनीच्या माध्यमातून फलटण शहराच्या लगत साकारत असलेल्या ‘चैतन्य विहार’ या भव्य गृहप्रकल्पामुळे फलटणकरांसाठी आपले स्वप्नातले घर साकारण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे.

गेल्या 15 वर्षांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेल्या श्री डी अँड जी कॉर्प एल.एल.पी. ने ‘प्रत्येकासाठी ज्याला हवंय स्वत:चं हक्काचं घर’ या उद्देशाने सं.नं.44, विंचुणी रोड, बिरदेव नगर, मौजे जाधववाडी, फलटण (जि.सातारा) येथे 8 एकर परिसरात 128 एन.ए. (बिगरशेती) प्लॉटचा सर्वसुखसुविधांयुक्त भव्य ‘चैतन्य विहार’ हा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पाविषयी माहिती देताना प्रकल्प व्यवस्थापकांनी सांगितले की, चैतन्य विहार प्रकल्प हा ग्राहकांच्या सर्व गरजांचा विचार करुन बनवला आहे. ह्या प्रकल्पामध्ये लाईट, पाणी, रस्ते ह्या बेसिक सुविधांसह 50 पेक्षा अधिक अत्याधुनिक सुविधा देखील देण्यात आलेल्या आहेत. क्लब हाऊस, ओपन जिम, बॉक्स क्रिकेट, मुलांना खेळण्यासाठी चिल्ड्रेन्स प्ले एरिया आदींसाठी प्रकल्पातील तब्बल 30 गुंठे जागा देण्यात आली आहे. अंतर्गत सिमेंट काँक्रीटचे रस्ते, पथदिवे, कंपाऊंड वॉल, 24 तास सुरक्षा रक्षक सुविधा, सी.सी.टी.व्ही. सुविधा, व्हीजीटर्स कार पार्किंग, सुलभ कर्ज सुविधा, प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र 7/12, स्वतंत्र सोसायटी ऑफीस, मिटींग रुम, कम्युनिटी हॉल अशा एक ना अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाचे आणखीन एक वैशिष्ठ्य म्हणजे फलटणमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी प्रकल्प परिसरात शुद्ध हवेसाठी विविध प्रकारची झाडे लावून ऑक्सिजन झोन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला गेला पाहिजे.

कुटुंबाची सुरक्षितता आणि मुलांचे भविष्य ह्यासाठी ‘चैतन्य विहार’ ही फलटणकरांसाठी उत्तम निवड ठरणार आहे. त्यामुळे अशा सर्व सुखसुविधांनी संपन्न व प्रसन्ता आक्षि जीवन ऊर्जाने भरलेल्या हिरवाईच्या परिसरात नव्या स्वप्नाची सुरुवात करण्यासाठी ‘चैतन्य विहार’ मध्ये आजच आपली जागा बुक करा. अधिक माहितीसाठी 7770006870 अथवा 7770006871 या क्रमांकावर संपर्क करा, असे आवाहन श्री डी अँड जी कॉर्प एल.एल.पी. कंपनीकडून करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!