गटशिक्षणाधिकार्‍याच्या निलंबनासाठी सीईओ पुढे ठाणं मांडणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २ जुलै २०२१ । सातारा । राज्यात महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली असून लिंगपिसाटांना कोणाचेही भय उरलेले नाही. सातार्‍यातही गट शिक्षणाधिकारी एका महिलेकडे निर्लज्ज अपेक्षा व्यक्त करतो. या विकृतीवर अद्याप कारवाई झाली नाही. त्या अधिकार्‍यास निलंबित करावे, या मागणीसाठी आम्ही भाजप कार्यकारिणीचे सदस्य सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांपुढे ठाणं मांडणार आहोत असा इशारा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी सातार्‍यात पत्रकार परिषदेत दिला.

सातारा जिल्ह्यात सोमर्डी व बेलावडे येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या. पीडित मुली व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर गुरुवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात चित्राताई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, कायदा आघाडीचे अ‍ॅड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे यावेळी उपस्थित होते.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, महिलांवरील होणारे अत्याचारबाबत माहिती घेण्यासाठी मी सातार्‍यात आले आहे. ज्या छत्रपती च्या महाराष्ट्रात आपण रहातो तिथं शिक्षण विभागातील एकजण शरीर सुखाची मागणी करतो हे गोष्टच लांछनास्पद आहे. आता या प्रकरणामध्ये विशाखा कमिटी गठीत करण्यात आली मग इतका वेळ ही व्यवस्था का झाली नाही. लिंगपिसाट व्यक्तींना आज कोणाचाही धाक राहिला नाही. त्यामुळे याला आपण सर्वांनी धडा शिकवला पाहिजे. सातारा पंचायत समितीमधील ज्या धुमाळ ने हे विकृत काम केलं आहे त्याला या व्यवस्थेतून हद्दपार केलं पाहिजे. गट शिक्षणाधिकार्‍यांच्या निलंबनासाठी आम्ही सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यापुढे ठाणं मांडणार असल्याचा इशारा चित्राताई यांनी दिला.

राज्यात पोक्सोच्या केसेसमध्ये वाढ झाली आहे. याबाबीकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. करोना काळात ही असेच गुन्हे होत आहेत अन त्याला या महा विकास आघाडीकडून राजाश्रय मिळत आहे, ही बाब दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासनमध्येही लिंग पिसाट आहेत. महिलांवरील अत्याचार होऊन ही तक्रार दाखल होत नाही. त्यामुळे राज्यात कायदा अन प्रशासनाचा बोजवारा उडालेला दिसत आहे. राज्यासाठी गंभीर प्रश्‍न आहे अशी सडकून टीका त्यांनी केली. अशा अनेक गोष्टीला सरकारला काय देणे-घेणे आहे की नाही, असा प्रश्‍न पडतो आहे. अत्याचारित महिलांच समुपदेशन महत्वाचं आहे. अन सरकारच्या माध्यमातून ते मिळण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रयत्न करणार आहोत.

महिलांवरील अत्याचार हा राजकीय प्रश्‍न नाही पण या सामाजिक प्रश्‍नाकडे सरकार आपली जबाबदारी झटकत आहेत. ही बाब दुर्दैवी आहे. सरकारने सगळ्या गोष्टीत राजकारण करावे पण महिला कौन्सिलिंग साठी पुढे आले पाहिजेत आज सातारा जिल्ह्याचे कुठं आहेत पालकमंत्री हा ही प्रश्‍न समोर येत आहेत. जिल्हयातील अत्याचारित कुटुंबियांची पालकमंत्र्यांनी भेट घेतली का? पालक या शब्दाचा अर्थ काय असतो? असे सवाल चित्राताई यांनी करत राज्यात दोन दोन गृहमंत्री असताना महिला अत्याचारामध्ये वाढ व्हावी या विषयी चिंता व्यक्त केली. महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहे. वनक्षेत्रपाल दिवंगत दीपाली चव्हाणच्या लढाईला चांगले वकील देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. एसओपी बाबत कोणताही निर्णय नाही. सरकारला तोंड दाखवायला वेळ नाही आता दोन दिवसांच अधिवेशन आहे अन यामध्ये राज्याशी निगडीत संवेदनशील किती मुद्धे मांडले जाणार आहेत ? अशी शंका चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!