स्थैर्य, सातारा, दि.७: सातारा शहरातील आरटीओ चौकात सोमवारी कारने अचानक पेट घेतला. सोमवारचा दिवस असल्याने आरटीओ चौक गजबजलेला असतो. याचठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांच्यात खळबळ उडाली. रस्त्यावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली. प्रसंगावधान राखत नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.