स्थैर्य, वाई,दि.७: जांभळी (ता. वाई) येथे घराशेजारी चरत असणाऱ्या बैलावर दाट झाडीत लपून बसलेल्या बिबट्याने झडप घालून ठार मारले.हणमंत दीक्षित यांचे अंदाजे तीस ते चाळीस हजाराचे नुकसान झाल्याची तक्रार जांभळी गावाचे पोलीस पाटील आनंदा कांबळे यांनी वनविभागात दिली आहे.
जांभळी हा वाई च्या पश्चिम भागातील दुर्गम भाग असून या परिसरात घनदाट जंगल आहे.या जंगलात अनेक प्राणी राहत आहेत. या भागात बिबट्याचा ही वावर आहे. गेल्या चार दिवसांपासून या भागातील नागरिकांना बिबट्याचे दिसत असल्याने लोकांमध्ये भित्तीचे वातावरण आहे.शनिवारी सकाळी दहा वाजता जांभळीतील सोनारवाडी येथे घराशेजारी गवत खाण्यासाठी बैल बांधण्यात आला होता. चरत असणाऱ्या बैलावर बिबट्याने हल्ला केल्याने कोणालाही कळायच्या आतमध्ये बैलावर हल्ला केला. ग्रामस्थांनी आरडा-ओरड केल्या नंतर बिबट्याने जंगलात धूम ठोकली.या हल्ल्यात बैलाचा मृत्यू झाला. वनविभागाकडून संबधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणू चाळीस हजार देण्यात येणारा आहेत असे वनविभागाचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी सांगितले. या परिसरात शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने अनेकांच्या दावणीला शेळी, मेंढी, म्हैस, गाय, व बैल अशी जनावरे पाळलेली आहेत, त्यांच्या निघणाऱ्या दुधावर लोकांचा उदरनिर्वाह चालू असतो, त्यांचे उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन नाही, भात पिक आणि पाळीव जनावरे हाच मुख्य व्यवसाय असल्याने बिबट्याच्या अचनाक होणाऱ्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. संबंधित विभागाने त्वरित या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी जांभळी व परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी केली आहे.
जंगली श्वापदांनी पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्यास वनविभाग त्यांना त्वरित नुकसान भरपाई देत असते. जांभळी पासून त्या परिसरातील जंगली भागात बिबट्या सह काही जंगली हिंस्र प्राण्यांचे वास्तव्य आहे. परिसरातील नागरिकांनी आपल्या पाळीव जनावरांसह स्वतःचे रक्षण करावे असे आवाहन वाईचे वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी केले आहे.