दैनिक स्थैर्य | दि. २७ एप्रिल २०२४ | फलटण |
४३ माढा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा.) विधानसभा मतदार संघामध्ये मतदान टक्का वाढवण्यासाठी स्वीपअंतर्गत विविध स्तरावर व ठिकाणी विविध उपक्रमांद्वारे मतदान जनजागृतीचे काम सुरू आहे. त्यानुसार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी शुभ लॉन्स, शिंदेवाडी, ता. फलटण येथे विवाहनिमित्ताने वर व वधूनी मतदानाचा हक्क बजावण्याचा संदेश दिला.
‘आपलं मत, आपलं भविष्य’, ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, अशा विविध घोषवाक्यांद्वारे अनोख्या पद्धतीने मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी स्वीप सहायक अधिकारी सचिन जाधव यांनी मतदानाचे महत्त्व सांगितले.
यावेळी स्वीप टीम सदस्य उपस्थित होते. स्वीपअंतर्गत फलटणमध्ये राबविलेल्या या मतदान जनजागृतीच्या अनोख्या उपक्रमाची चर्चा सुरू असून त्याचे कौतुक होत आहे.