भारतीय बॅडमिंटन संघाच्या सुवर्णयुगाची सुरुवात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२२ । मुंबई । ‘तब्बल 73 वर्षांनंतर थॉमस कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने आज, 14 वेळा अजिंक्यपद जिंकलेल्या इंडोनेशिया संघाला 3-0 असं नमवून मिळवलेला विजय ऐतिहासिक आहे. या विजयाने भारतीय बॅडमिंटन क्षेत्राची, भारतीय क्रीडा जगताची मान उंचावली आहे. पुरुष एकेरीतील विजेते लक्ष्य सेन आणि किदम्बी श्रीकांत, तसेच दुहेरी सामन्यातील विजेते सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन. तुमच्या कामगिरीने देशवासियांना अवर्णनीय आनंद दिला आहे. तुमच्या यशाचा देशाला अभिमान आहे. तुमचे यश हे भारतीय बॅडमिंटनच्या सुवर्णयुगाची सुरुवात आहे.’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी थॉमस कप विजेत्या भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाचं अभिनंदन केलं आहे.


Back to top button
Don`t copy text!