तत्कालीन सत्ताधाऱ्यांमुळेच बाणगंगा Phaltan Banganga River नदी दूषित : समशेरसिंह Samshersinh

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 30 मे 2024 | फलटण | फलटण शहरामधून प्रवाहित होत असलेल्या बाणगंगा नदी पात्र हे अत्यंत खराब झालेले आहे. फलटण नगर परिषदेवर लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तत्कालीन सत्ताधिकाऱ्यांकडे वारंवार सर्वसाधारण सभेच्या माध्यमातून व इतर वेळी सुद्धा बाणगंगा नदी पात्र स्वच्छतेची माझ्यासह माझे सहकारी अशोकराव जाधव, सचिन अहिवळे अनुप शहा यांनी वारंवार मागणी केलेली होती. परंतु मुद्दामून हेतू पुरस्कृत तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी बाणगंगा नदी पात्र स्वच्छतेची मोहीम हातात घेतली नाही; असे मत फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

दैनिक स्थैर्यच्या वतीने बाणगंगा नदी दूषित बाबत बातमी प्रकाशित करण्यात आली आहे. यावर विशेष प्रतिक्रिया देताना फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते समशेरसिंह निंबाळकर बोलत होते.

फलटण नगर परिषदेकडे विविध योजनांचा अखर्चित निधी कोट्यावधी रुपयांचा आहे. काही योजना तर आताच्या काळात अमलात सुद्धा येऊ शकत नाही. त्या योजनांच्या ऐवजी बाणगंगा नदी स्वच्छतेसाठी फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून निधी खर्च करण्यात यावा. याबाबत पालिका प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे. याबाबत कोणतीही व कसलीही मदत नगरपालिका प्रशासनाला लागल्यास खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून नक्की करण्यात येईल; असेही यावेळी समशेरसिंह यांनी स्पष्ट केले.

राज्यातील इतर शहरांप्रमाणे ज्या प्रकारे स्वच्छ व सुंदर नदी आहे. नदीकिनारी फलटणकर नागरिकांना फिरण्यासाठी वॉकिंग ट्रॅक व लहान मुले व इतरांसाठी छोटे बागबगीचे, ओपन जिम या पद्धतीने नदीचा विकास करून नदीपात्रातील सर्व घाण काढून नदी खोलीकरण व रुंदीकरण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष निधी सुद्धा मंजूर करून आणता येईल. यासोबतच नगर परिषदेकडे जो अखर्चिक निधी आहे; तो निधी सुद्धा शासन मान्यतेने नदीच्या पुनर्जीवनासाठी वापरता येऊ शकतो; असेही यावेळी समशेरसिंह यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!