दैनिक स्थैर्य । दि. ०६ एप्रिल २०२३ । मुंबई । दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ (रजि.) यांच्या विद्यमाने भगवान तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ४ एप्रिल रोजी भायखळा मच्छी मार्केट, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई आंबेडकर यांचा ११७ वा मंगल परीणय दिन महोत्सव सायंकाळी ४:०० ते रात्री १०:०० दरम्यान बाबासाहेबांची नातसून मनीषा आंबेडकर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास मनीषा आनंदराज आंबेडकर व भायखळा विधानसभा, आमदार यामिनी यशवंत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, सदर प्रसंगी मनीषा आनंदराज आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले तर बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोदजी मोरे यांनी ज्योत प्रज्वलित केली, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत व माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे यांनी फुलसुमन अर्पण केली, धार्मिक विधी संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार आणि मनोहर मोरे यांनी आपल्या गोड वाणीने पार पाडला, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान तांबे यांनी तर सूत्रसंचालन नागेश जाधव यांनी उत्कृष्टपणे सादर केले. त्याचप्रमाणे १२५ व्या जयंती निमित्त माता रमाईची लेक पुरस्कार मनीषा आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर संविधान चषक प्रथम क्र. बौद्धजन कामगार समिती, जे.जे. रुग्णालय, द्वितीय क्र. मिलिंद नगर स्पोर्ट्स क्लब यांनी पटकावले त्याचे ही वितरण मनीषा आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर प्रसंगी जेष्ठ साहित्यीक योगीराज बागुल, आमदार यामिनी जाधव व मनीषा आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे समाजाप्रती असणारे योगदान व संघर्षमयी जीवनप्रवास यावर अमूल्य असे आपले विचार व्यक्त केले. तद्नंतर सम्यक कोकण कला संस्थेच्या कलावंतांनी समाजप्रबोधनात्मक बुद्ध-भीम गीत कार्यक्रम सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली, सदर कार्यक्रमास बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती विनोद मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, सरचिटणीस राजेश घाडगे व्यवस्था मंडळाचे अनेक मान्यवर, वंचित बहुजन आघाडी दक्षिण विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरचिटणीस ऍड. अनुराधा साळवे, खजिनदार मोहन मर्चंडे, उपाध्यक्ष शांतू डोळस, सिद्धार्थ कांबळे, सुरेश कांबळे, अशोक केदारे, रविंद्र कांबळे, श्रीधर ना. जाधव, शांताराम कोळसे, सुरेश गमरे, सचिव नागेश जाधव, दिपक क्षीरसागर, प्रकाश जाधव, संजय शिंदे, अशोक कांबळे, मीनाक्षी सकपाळ, दिनेश घोडके, अमोल साळुंखे, संदीप धोत्रे, दिपक तांबे, सुमेध सुर्वे, किशोर (विजू) पराडे, आशिष जाधव, उपखजिनदार मनोहर मोरे, हिशोब तपासणी ऍड. कपिल झोडगे या सर्वांनी अथक परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर विदर्भ, कोकण मुंबई, मुंबई उपनगर अश्या राज्यातील कानाकोपऱ्यातून लोकांनी हजेरी लावली होती अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष भगवान तांबे यांनी आपले मोलाचे विचार मांडून सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.