दैनिक स्थैर्य । दि. २८ मार्च २०२३ । मुंबई । बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी या संघाच्या मुंबई विभागाची वार्षिक सर्वसाधारण सभा मा. सिद्धार्थ पवार यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे संपन्न झाली, सदर प्रसंगी संपूर्ण विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती कमिटी, विभाग अधिकारी, सर्व समित्या, त्यांच्या पोटसमित्या त्यांचे सन्मानिय पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते,
सदर प्रसंगी संस्कार समितीचे अध्यक्ष संदेश गमरे आणि कैलास मोहिते यांनी धार्मिक विधी पार पाडला तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांनी करून बौद्धजन सहकारी संघाच्या कामकाजाचा आढावा घेतला तर सूत्रसंचालन सरचिटणीस संजय तांबे केले.
विश्वस्त मंडळांनी विभागातून आलेल्या उमेदवारांच्या अर्जांची छाननी करून संघाची घटना व नियमावलीप्रमाणे उमेदवारांच्या मुलाखती घेऊन निवड मंडळ प्रमुख विश्वस्त संजय पवार, विश्वस्त के. सी. जाधव, विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास गमरे यांनी कार्यकारिणी घोषित केली त्यानुसार अध्यक्षपदी राजेंद्र जाधव, उपाध्यक्षपदी सुरेश पवार, कार्याध्यक्षपदी दीपक मोहिते, उपकार्याध्यक्षपदी अशोक कदम, सरचिटणीसपदी संदेश गमरे, चिटणीसपदी अजय जाधव, कोषाध्यक्षपदी प्रदीप कदम यांची निवड करण्यात आली, तसेच विभाग अधिकारीपदी गुहागर विभागात संतोष कदम, पेवे विभागात किशोर जाधव, गिमवी विभागात सुनिल पवार, वेळम विभागात शैलेश जाधव, पिंपर विभागात संतोष पवार, शिर विभागात विरेंद्र पवार, कुडळी विभागात सचिन गमरे यांची तर सल्लागार पदी विभाग क्र. ३ मध्ये संदेश जाधव, विभाग क्र. २ मध्ये अमित पवार, विभाग क्र. ५ मध्ये उत्तम जाधव, विभाग क्र. ६ मध्ये सुरेश गमरे यांची निवड झाली, सदर प्रसंगी माजी चेअरमन संजय जाधव, माजी चिटणीस सचिन पवार, व्हाईस चेअरमन दीपक जाधव, शशिकांत मोहिते, आजी-माजी कार्यकारिणी, विभाग अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पाडून त्याना शुभेच्छा देत त्यांच्याकडे पदभार सोपविण्यात आला.
सरतेशेवटी सरचिटणीस संजय तांबे यांनी सभागृहाचे आभार मानून सदर सभेची सांगता केली.