दैनिक स्थैर्य | दि. २१ जानेवारी २०२४ | फलटण |
कोरेगाव तालुक्यातील आसनगाव येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न व फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटणच्या कृषीदूतांनी कृषी जागरूकता व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शेतकर्यांना शेतमालाच्या विक्रीसाठी उपयोगी पडणार्या अॅप्लिकेशन्सची परिपूर्ण माहिती दिली.
यावेळी गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर व श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर सर, कार्यक्रम अधिकारी स्वप्नील लाळगे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, अधिकारी प्रा. नितीषा पंडीत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत शुभम मोरे, विजय नाळे, सिद्धांत फडतरे, अनिकेत मदने, ऋषिकेश चव्हाण, अभिषेक खोसे, अजिंक्य मोरे या कृषीदूतांनी हा कार्यक्रम पार पाडला.