दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२१ । कुडाळ । जावळी तालुक्यातील सरताळे येथे सहा दिवसांपूर्वी कुडाळ पाचवड रस्त्या लगत कॅनॉलकडे जाणार्या रस्त्यावर शर्यतीच्या बैलाची निर्घृण हत्या झाली होती. याप्रकरणी मेढा पोलिसांनी कुमार प्रकाश पडवळ वय 28 कुंभारवाडी, ता. वाई याला गजाआड केला आहे.
याबाबत माहिती अशी, सहा दिवसांपूर्वी शर्यतीच्या बैलाची सरताळे येथे पाचवड रस्त्यालगतच्या कॅनॉलमध्ये निर्घृणपणे हत्या झाली होती. बैलाचा पाय तोडुन गळ्याला दोरी बांधून त्याला फास लावून क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकारामुळे शेतकरी व व प्राणीप्रेमी यांच्यात संतापाची लाट उसळली होती. दरम्यान, मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी तपासाची सूत्रे गतिमान करत हत्या झाल्यापासून सहा दिवसांच्या आतच बैलाची हत्या करणारा आरोपी कुमार प्रकाश पडवळ कुंभारवाडी तालुका अटक केली. आरोपीने भोर (जि. पुणे) येथील बैल बाजारातून पिकअप गाडीतून आणून झाडाला बांधून त्याची निर्दयपणे हत्या केली असल्याची कबुली दिली आहे.
या गुन्ह्यांमध्ये वापरण्यात आलेली पीक अप (एमएच 11 सीएच 2019) ताब्यात घेण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत. इमरान मेटकरी, नितीन जाधव यासह मेढा कुडाळ पोलीस कर्मचारी यांनी या सर्व तपासकामी सहभाग घेतला.