खुनाच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ एप्रिल २०२३ | फलटण |
फलटण येथील खुनाच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी सातारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आला आहे. त्यास फलटण शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

याबाबत सातारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापूसाहेब बांगर यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेले व फरारी आरोपी पकडण्याबाबत आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा साताराचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सपोनि पवार, सपोनि भोरे, पो. उपनिरीक्षक शिंगाडे यांचे विशेष पथक तयार करून फरारी आरोपींना पकडण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, दि. ११ एप्रिल रोजी पोनि अरुण देवकर यांना माहिती प्राप्त झाली की, पोलीस अभिलेखावरील खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी इसबु उर्फ विष्णू अशोक भोसले (रा. महादेवनगर, फलटण) हा माकडमाळ, फलटण येथे येणार आहे. त्याप्रमाणे त्यांनी विशेष पथकास कारवाईच्या सूचना दिल्या. विशेष पथक माकडमाळ येथे पोहोचताच सदर आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यास पकडले व पुढील कारवाईकरीता फलटण शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

या कारवाईत पोलीस अधिकार्‍यांसह सहा. फौजदार तानाजी माने, सुधीर बनकर, पो.ह. साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, अमोल माने, पो.ना. अमित सपकाळ, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, शिवाजी भिसे, महिला पो.ना. मोनाली निकम, पो.कॉ. स्वप्निल दौंड, स्वप्निल माने, वैभव सावंत, मोहसीन मोमीन यांनी सहभाग घेतला.

या कारवाईतील सहभागी पोलिसांचे पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक बापूसाहेब बांगर यांनी अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!