दैनिक स्थैर्य | दि. २६ मार्च २०२४ | फलटण |
लोणंद पोलीस ठाण्यात घरफोडीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरारी आरोपी चोच्या उर्फ शुभम राज्या शिंदे (वय ३८, रा. शेळकेवस्ती, लोणंद, ता. खंडाळा) यास त्याच्या घरातून सपोनि सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचार्यांनी सापळा रचून जेरबंद केले. त्यास अटक करून फलटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पोलीस रेकॉर्डवर असलेले व फरारी आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुशील भोसले यांनी फरारी आरोपींना अटक करण्याकामी विशेष मोहीम राबविली आहे.