बलात्काराचा विरोध केल्यानंतर आरोपीने काढले महिलेचे डोळे, गावापासून अवघ्या 100 मीटर दूर घडली घटना


 

स्थैर्य, शिरूर, दि.६: पुण्याजवळील शिरुरमध्ये बलात्काराचा विरोध करणाऱ्या 37 वर्षीय महिलेचे डोळे काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत महिलेची दृष्टी गेली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घटना शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील आहे. महिला रात्री 8.30 वाजता शौच्छासाठी बाहेर गेली असता एका अज्ञात व्यक्तीने तिच्यावर हल्ला चढवला. यावेळी महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न झाला, पण यात अपयश आल्याने आरोपीने महिलेच्या डोळ्यांवर हल्ला चढवला. घटना गावापासून फक्त 100 मीटर दूर घडली, पण गावातील कोणालाच महिलेचा आवाज आला नाही. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून, पुण्यातील ससून हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहे. शिरुर पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात कलम 307 आणि 354 अंतर्गत गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!