दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२४ | फलटण |
फलटण नगरपरिषदेत सोमवार, २९ जुलै रोजी दुपारी २ वाजता अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचा ६० वा वर्धापन दिन सफाई कर्मचार्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
या वर्धापन दिनानिमित्त राजू मारुडा यांनी सांगितले की, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा ६० वर्ष पूर्ण होत आहे. खरे तर राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य व दलित मित्र पुरस्कारप्राप्त कै. वासुदेव चांगरे यांनी लाड-पागे समितीनुसार देशातील सफाई कर्मचार्यांना न्याय दिला, म्हणूनच वारसा हक्क लाड-पागे शिफारशीनुसार वारसाहक्काने नियुक्ती दिली जाते, म्हणून आज आपण सर्वजण ६० वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला.
या कार्यक्रमास पुणे विभागीय अध्यक्ष राजू मारुडा, स्वच्छता निरीक्षक पी. के. तुळशे, स्वच्छता निरीक्षक भोसले, जिल्हाध्यक्ष युवा प्रकोष्ठा आनंद डांगे, अध्यक्ष फलटण शहर मनोज मारुडा, उपाध्यक्ष फलटण शहर रमेश वाघेला, महामंत्री लखन डांगे, खजिनदार निखिल वाळा, सहखजिनदार सारंग गलियल, अनिल डांगे, विनोद मारुडा, प्रकाश मारुडा, सूरज मारुडा, चंदूभाई मारुडा, अजय मारुडा, रोहित मारुडा, प्रवीण गलियल, सागर वाळा, प्रमित डांगे, रवी वाळा, ज्योती वाळा, राधा वाडा, सौ. शीतल वाळा, सौ. मीनल डांगे, सौ. आरती सोलंकी, गुणगुण डांगे, संघटनेचे पदाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी व सफाई कर्मचारी, महिला उपस्थित होत्या, अशी माहिती संघटनेचे सचिव नितीन वाळा यांनी दिली.
सूत्रसंचालन मनोज मारुडा यांनी केले, आभार रमेश वाघेला यांनी मानले.