दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२४ | फलटण | नागपंचमी व राखी पौर्णिमा या सणा निमित्त संगिनी फोरम, फलटणने आयोजित केलेला गारवा शॉपिंग व फुड फेस्टिवल हा एक स्तुत्य व उल्लेखनीय उपक्रम असुन या द्वारे नविन महिला उद्योजिका, महिला बचत गटाच्या सदस्या यांच्या उत्पादीत वस्तू साठी बाजारपेठ उपलब्ध होत आहे; असे प्रतिपादन जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजनचे चेअरमन उन्मेषभाई करनावट यांनी केले.
संगिनी फोरम फलटण यांनी आयोजित केलेल्या गारवा शॉपिंग व फुड फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून उन्मेषभाई करनावट बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या उडान चेअरपर्सन सौ. प्रीतीभाभी करनावट, माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, संगिनी फोरम अध्यक्षा सौ. अपर्णा जैन, संस्थापक अध्यक्षा सौ. स्मिता शहा, जैन सोशल ग्रुप अध्यक्षा सौ. सविता दोशी, उपाध्यक्ष व संगिनी को-आडिनेटर श्रीपाल जैन, सचिव प्रीतम शहा, खजिनदार समीर शहा, माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, श्रीराम बझारचे संचालक व जैन सोशल ग्रुपचे माजी अध्यक्ष तुषार गांधी, संचालक डॉ. मिलिंद दोशी, संगिनी सचीव सौ. प्रज्ञा दोशी, खजिनदार सौ. मनीषा घडिया, युवा फोरम अध्यक्ष तेजस शहा, फलटण शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, लायन्स क्लब प्लॅटिनमच्या अध्यक्षा सौ.संध्या फाळके, कार्यक्रमाचे प्रायोजक चंदुकाका सराफ अँड सन्सच्या सौ. नेहाभाभी शहा, अरिहंत टीव्हीएसच्या युवा उद्योजक सिद्धांत दोशी, एनोजिक केंगण वॉटर डिस्ट्रीब्यूटर सौ. वृषाली गांधी, नेत्र नंदन आय हॉस्पिटलचे डॉ. धनराज करचे, सर्व महिला मंडळाच्या अध्यक्षा तसेच बहुसंख्य संगिनी सदस्या, जैन सोशल ग्रुप सदस्य, युवा फोरम सदस्य व सर्व स्टॉल धारक महिला वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संगिनी सदस्यांनी मंगलाचरणाने केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
गारवा फेस्टिवल निमित्त संगिनी फोरम फलटणच्या कार्याचा आढावा घेणारे ज्येष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता संपादक असलेल्या साप्ताहीक जनसेवा या विषेश अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात संगीनी फोरमच्या माजी अध्यक्षां सौ. स्मिता शहा, सौ. सविता दोशी,सौ.निना कोठारी,सौ.संगिता दोशी यांचा प्रीतीभाभी भाभी करनावट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
योगा शिक्षिका माही कोठारी,सौ. सुवर्णा रणदिवे, फलटण वकील संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मयुरी मेहता यांचा विशेष सत्कार करण्यात आला.फलटण मधील महिला मंडळाच्या अध्यक्षांचा श्रीफळ व रोप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पत्रकार बंधु साप्ताहिक राम आदेशचे संपादक बापूराव जगताप, दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधी यशवंत खलाटे पाटील, दैनिक सकाळ चे कोळकी प्रतिनिधी संजय जामदार यांचाही उचित सत्कार करण्यात आला. सर्व प्रायोजक यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.MRC चेअरमन उन्मेश भाई करनावट व सौ. प्रीती भाभी करनावट याचां संगिनी फोरम कडून भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संगिनी फोरम अध्यक्षां अपर्णा जैन यांनी संगिनी फोरमच्या कार्याचा आढावा घेऊन गारवा फुड फेस्टिवल आयोजन बाबत माहिती देऊन संगिनी पदाधिकारी व सदस्या यांच्या सहकार्यामुळे गारवा फुड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन दीप्ती राजवैद्य व पोर्णिमा शहा यांनी केले. आभार प्रदर्शन संगिनी सह सचिव नीता दोशी यांनी केले. फूड फेस्टिवल आयोजना बद्दल सहभागी स्टॉल धारक व उपस्थित फलटणकर महिला , अबालवृद्ध व खवय्ये वर्ग यांनि संगिनी फोरम ची प्रशंसा केली.