दैनिक स्थैर्य | दि. 14 जुन 2024 | फलटण | तालुक्यातील निंबळक गावामध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या किंवा तरस असल्याची शक्यता वर्तवली जात होती. ती शक्यता आता खरी ठरत निंबळक गावामधील तो बिबट्या वनविभागाच्या कॅमेरात कैद झाला असल्याची माहिती समोर येत आहे.
संजय बबनराव पिाळ, पेटकर माळ, निंबळक ता. फलटण यांचे दि. 13 रोजी रात्री 3 वाजण्याच्या सुमारात म्हैस जातीचे रेडकु वस्तीवर घरासमोरच बांधलेले होते. बिबट्याचे ते रेडकु जागेवरच ठार मारुन अंजाजे एक हजार फुटावर ऊसाच्या शेतात ओढत नेले. त्याचे अंदाजे वजन १०० किलो असण्याची शक्यता आहे.
सदर घटनेची माहीती वनविभागाला कळविल्यानंतर वनविभाचे अधिकारी जागेवर येऊन माहीती घेऊन पंचनामा केला. ज्या ठिकाणी बिबट्याने ऊसामध्ये रेडकु नेले होते त्या ठिकाणी कॅमेरा बसवला होता. त्या कॅमेर्यात पूर्ण वाढ झालेला, नर जातीचा बिबट्या कॅमेर्यात कैद झाले आहे; अशी माहिती समोर येत आहे.
या भागात शेतकरी वर्गाने काळजी पूर्वकच शेता मध्ये कामे केली पाहिजे. लहान मुलांना किंवा एकट्याने शेतात जाणे धोक्याचे ठरू शकते असे सुद्धा स्पष्ट केले जात आहे.