
स्थैर्य, सातारा, दि.१६: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रक रणातील आरोपीला न्यायालयाने दहा वर्षाची सक्तमजुरीआणि 5 हजार दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जीवाजी रामचंद्र साळुंखे वय 80 रा. मजरे शेंबडी, ता. जावली असे आरोपीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, नवरात्रोत्सव काळात मजरे शेंबडी, ता. मेढा येथील जननी मंदीरात आरोपी देखभालीचे काम करत होता. त्याठिकाणी सन 2017 मध्ये नवरात्रोत्सव काळात आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला व कोणाला काही सांगितलेस तर जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरून पिडीतेने कोणाला काहीही सांगितले नाही. काही काळानंतर पीडितेमध्ये शारीरिक बदल होत असल्याने आईने तिला जिल्हा रुग्णालयात नेवून तपासणी केली असता पिडीता गरोदर असल्याचे समजले. पिडितेस आईने विश्वासात घेवून विचारले असता तिने नवरात्रोत्सवाचे काळात आरोप जीवाजी लैगिक साळुंखे याने अत्याचार केल्याचे सागितले.
यबाबत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीवर मेढा पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दि. 11 एप्रिल 2018 रोजी दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक भिमराव झांझुर्णे यांनी गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून आरोपी विरुद्ध सबळ पुरावा तसेच शास्त्रोक्त पुरावा प्राप्त करुन मुदतीत न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले. नमुद खटल्याची सुनावणी न्या. ए. के. पटणी जादा विशेष सत्र न्यायाधिश सातारा यांच्या न्यायालयात झाली. याप्रकरणी आज (दि.16 फेब्रुवारी) न्यायालयाने आरोपी जिवाजी रामचंद्र साळुखे यास 10 सक्त मजुरी व 10 हजार दंड व दंड न दिलेस सहा महीने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे.
खटल्याच्या सुनावणीमध्ये सरकारी अभियोक्ता म्हणुन अॅड. श्रीमती अनुपमा घारगे/गाडवे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहा.पो.उप.निरीक्षक संजय राजेभोसले (मेढा पोलीस ठाणे), प्रॉसिक्युशन स्क्वॉड, सातारा अंमलदार स. पो. उ. नि. श्रीमती घारगे, हवालदार शेख, बेंद्रे, शिंदे, शेख, कुंभार, घोरपडे, भरते यांनी सरकारी वकील यांना योग्य ते सहकार्य केले.