स्थैर्य, सातारा दि. १६: सातारा जिल्ह्यात दि. 18 जानेवारी 2021 रोजी ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने सातारा शहर श्री छत्रपती शाहु क्रिडा संकुल परिसरातील वाहनधारकांच्या व पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरातील वाहतूकीचे नियमन करणे आवश्यक आहे. वाहतूकीचे नियमनाकरिता श्री छत्रपती शाहु क्रिडा संकुल परिसरातील वाहतुक मार्गात बदल तसेच पार्किग व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
कोणताही अनुचित प्रकार होऊन कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परिसरातील अंतर्गत वाहतुकीचे मार्गात व वाहनांचे पार्किग व्यवस्थेत बदल करणे अत्यावश्यक आहे. या अनुषंगाने अजयकुमार बंन्सल पोलीस अधिक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये सातारा शहरातील श्री छत्रपती शाहु क्रिडा संकुल परिसरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी व वाहनांचे पार्किग व्यवस्थेकरीता दि. 18 जानेवारी 2021 चे 00.00 वाजल्या पासून मतमोजणी प्रक्रिया पारपेडपर्यंत तात्पुरता बदल करण्यात येत आहे. याची नोंद घ्यावी.
वाहतूक मार्गातील ताप्तुरते बदल- सातारा श्री छत्रपती शाहु क्रिडा संकुलकडे जाणारा मार्ग हा सुभाषचंद्र बोस चौक, एस.टी.स्टॅड इनगेट येथून मतमोजणी केंद्राकडे जाणारे सर्व प्रकारचे वाहनां करीता वाहतुकीसाठी बंद राहील.
पर्यायी मार्ग – मेढा, महाबळेश्वर, जुना हायवे मार्गे येणाऱ्या सर्व एस.टी.बसेस तसेच सर्व वाहने एस.टी.स्टॅड येथे जाण्याकरिता भू विकास बँक जुना आर.टी.ओ चौक मार्गे ये जा करतील. वाढेफाटा मार्गे येणारी सर्व वाहने एस.टी.स्टॅड येथे जाण्याकरिता जुना आर.टी.ओ चौक येथून पारंगे चौक मार्गे ये जा करतील एस.टी.बसेस पारंगेचौक येथे एस.टी.स्टॅड इनगेट मार्गे ये जा करतील इतर सर्व वाहने पारंगे चौक येथून पोवईनाका तहसिलदार ऑफिस मार्गे एस.टी.स्टॅड येथे ये.जा करतील.
बॉम्बे रेस्टॉरंट, शिवराज फाटा येथून मोळाचा ओढाकडे जाणारे सर्व वाहनांनी राधिका रोड मार्गाचा वापर करावा. वाहनांचे पार्किग शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे दुचाकी, चारचाकी करीता एस.टी.स्टॅड समोर असणारे महसूल विभागाचे पार्किग जागेत व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणूक निकालकरीता आलेल्य नागरिकांचे सर्व प्रकारचे वाहना करीता पुर्वीचे भू विकास बँकचे मोकळे मैदानावर पार्किग व्यवस्था करण्यात आली आहे. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.