दैनिक स्थैर्य | दि. १३ मार्च २०२३ | फलटण |
सोमंथळी (ता. फलटण) येथे घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग फलटण यांनी ४,९७,०५१ रुपयांच्या रकमेस तांत्रिक मंजुरी दिली आहे.
या कामासाठी विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून स्वच्छ भारत अभियान टप्पा २ मधून हे काम होणार आहे.
सोमंथळीच्या घनकचरा व्यवस्थापन कामास मंजुरी मिळाल्याने या गावातील घनकचर्याचा प्रश्न आता संपुष्टात येणार आहे.