दैनिक स्थैर्य । दि. १२ मे २०२२ । फलटण । फलटण (प्रतिनिधी) जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती फलटण व केंद्र निंबळक आयोजित श्री. राजेंद्रकुमार आकोबा सस्ते(सासकल), श्री.बाळासाहेब ज्ञानदेव साळुंखे(सुळवस्ती), श्री.विजय रामचंद्र थोरात(श्रीरामवाडी), श्री.पोपट सोनबा जाधव (रामराजेनगर उळूंब) यांचा सेवापुर्ती सत्कार समारंभ व अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन अनंत मंगल कार्यालय फलटण येथे करण्यात आले हाेते.यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, शिक्षकाचे कार्य हे समाजाला दिशादर्शक असून उद्याची पिढी घडविण्यासाठी शिक्षक कायम प्रयत्नशील असतात.अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं असते. अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालून जाऊन देशाचे उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी झटत असतात. वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असणाऱ्या चौघा शिक्षकांनी आपलं आयुष्य ज्ञानदानासाठी खर्ची घातले आहे. या चारही शिक्षकांकडे वेगवेगळे कौशल्य राजेंद्रकुमार आकोबा सस्ते सर हे उत्कृष्ट गणित विषयाचे शिक्षक व उत्कृष्ट हार्मोनियम वादक असून त्यांच्यासारखा वादक तालुक्यात नाही. श्री विजय रामचंद्र थोरात सर ते उत्कृष्ट शिक्षक तर आहेतच पण सामाजिक राजकीय क्षेत्रातील गावच्या विकासाच्या दृष्टीने विधायक काम करण्यामध्ये आघाडीवर आहेत. श्री बाळासाहेब साळुंखे सर मितभाषी असले तरी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांची धडपड कायम होती. श्री.पोपट जाधव हे सुद्धा उत्कृष्ट शिक्षक म्हणून आपल्याला सुपरिचित आहेत. या चौघा शिक्षकांना मी त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी व आनंददायी जावो हीच सदिच्छा व्यक्त करतो. या चार सेवानिवृत्त शिक्षकांसहित तालुक्यातून इतरही अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी एकत्र यावे आणि आपलं आरोग्य जपत शिक्षणाच्या कार्याला वाहून घ्यावे.
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व सेवापूर्ती सत्कार सत्कार समारंभ सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. अखिल भारतीय शिक्षक संघाचे अध्यक्ष व माजी आमदार दिवंगत शिवाजीराव पाटील (अण्णा) यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर सर, श्री.महादेव माने, चेअरमन, श्रीराम सहकारी साखर कारखाना फलटण, श्री.जयकुमार इंगळे, अध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस, फलटण तालुका दूधपुरवठा संघाचे चेअरमन श्री.धनंजय पवार,श्री. राजाराम वरुटे,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, बाळासाहेब काळे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, श्री.माधवराव पाटील, श्री केशवराव जाधव, सौ.सुवर्णा खानविलकर नगरसेविका फलटण नगर परिषद, सौ वैशाली जगताप, संचालक प्राथमिक शिक्षक बँक, श्री. संजय सुतार, प्रदीप घाडगे, मच्छिंद्र ढमाळ, श्री.सुगंधराव जगदाळे, श्री रविंद्र भरते, श्री.अनिल शिंदे, श्री राजेश बोराटे सर, शिक्षण विस्तार अधिकारी श्री.अनिल संकपाळ, सि.जी.मठपती, निंबळक केंद्राचे केंद्रप्रमुख दारासिंग निकाळजे कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.तुकाराम कदम सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.प्रताप चव्हाण सरयांनी केले. यावेळी विविध गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी व मस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.