दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ ।औंध । वूक्षारोपण ही काळाची गरज असून सध्याच्या काळात शुध्द हवा व जास्तीत जास्त आँक्सिजन मिळावा यासाठी खटाव तालुक्यातील प्रत्येक शाळेने शिक्षकांनी वूक्षलागवडीबरोबरच संवर्धनासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे यांनी केले.
वडूज येथे वूक्षारोपण कार्यक्रमप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी लक्ष्मणराव पिसे,वनक्षेत्रपाल अर्जुन गंबरे,केंद्रप्रमुख तुकाराम यादव,प्रमोद जगदाळे, मोहन साळुंखे, वनपाल अमर शिंदे,बाळासाहेब जगदाळे, लक्ष्मण जाधव,किरण घाडगे,गणेश पवार, दिपक गिरी,राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना भराडे पुढे म्हणाल्या की, सध्याच्या विचित्र परिस्थितीत निसर्गाच्या सोबतीने आपण जीवन जगणे गरजेचे आहे. त्यासाठी वूक्ष हेच आपले सोबती बनू शकतील. त्यासाठी प्रत्येक शाळेचा परिसर हिरवाईने समूध्द करावा असे आवाहन करून कोरोना काळात प्राथमिक, माध्यमिक शिक्षक करीत असलेल्या कोरोना योध्दा म्हणून कामाचा ही त्यांनी गौरव केला. यावेळी बोलताना विस्ताराधिकारी लक्ष्मणराव पिसे म्हणाले की, यापुढील काळातही वनराई वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत निसर्गाचा समतोल राखण्याची हीच योग्य वेळ असून यासाठी शिक्षण विभाग, वन विभाग शाळांना जास्तीत जास्त सहकार्य करेल तरी वूक्ष लागवड चळवळीत सर्वांनी सहभागी होऊन समाज जागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.