स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सलग दुसऱ्या सत्रात भारतीय निर्देशांकांत घसरण

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
July 20, 2021
in इतर

दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । मुंबई । जागतिक बाजारात कमकुवतेचे संकेत मिळाल्याने, भारतीय निर्देशांकांनीही आज सलग दुसऱ्या दिवशी गॅप-डाऊन ओपनिंग दर्शवली. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की निफ्टी आणि सेन्सेक्सने कमी व्यापार केला, मात्र घसरणीवरून काहीशी सुधारणा घेतली. त्यामुळे एकूण विक्री काही प्रमाणात घटली. दरम्यान, घसरणीनंतर इंट्राडेमध्ये सुधारणा होऊनही निफ्टी १०० अंकांपेक्षा जास्त घसरला. तर निफ्टी बँक सलग ३ सत्रांनंतर घट दर्शवत ६५० अंकांच्या घसरणीवर स्थिरावली.

ब्रॉडर मार्केटची कामगिरी पाहता, बेंचमार्क निर्देशांकाच्या कामगिरीप्रमाणेच हेही निर्देशांक नकारात्मक स्थितीत राहिले. मिडकॅप निर्देशांक १ टक्क्यांपेक्षा जास्त कपातीवर स्थिरावले. तर स्मॉल कॅप निर्देशांकाने ७ दिवसांची विजयी घडामोड मोडीत काढत १.४१ टक्क्यांची घट अनुभवली. सेक्टर्सची कामगिरी पाहता, एफएमसीजी सेक्टर हा टॉप गेनर ठरला. तर उर्वरीत सर्व सेक्टर्सचे निर्देशांक नकारात्मक दिसले. निफ्टी मीडिया, रिअॅलिटी आणि मेटल निर्देशांक हे टॉप लूझर्स ठरले. त्यांनी प्रत्येकी २ टक्क्यांपेक्षा जास्त घट अनुभवली. तर स्टॉक्सच्या आघाडीवर हिंडाल्को, इंडसइंड बँक आणि टाटा स्टील हे टॉप लूझर्स ठरले. तसेच एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर हे टॉप गेनर्स ठरले. त्यांनी १-५ टक्क्यांच्या रेंजमध्ये नफा कमावला.

एसीसी कंपनीने आर्थिक वर्ष २२ च्या पहिल्या तिमाहीत नफा आणि महसूलात दमदार वृद्धी नोंदवली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ७% नी वाढले. मागील तिमाहीच्या तुलनेत त्रैमासिक उत्पन्न जास्त दर्शवल्याने, एचसीएल टेक कंपनीच्या स्टॉक्सनी इंट्रा डेमध्ये २ टक्क्यांची घसरण अनुभवली. म्हणून एकूण स्टॉक्समध्येही प्रॉफिट बुकिंग दिसून आले.

एकूणच, गॅप डाऊन ओपनिंगनंतर निर्देशांकांनी अस्थिर सत्र अनुभवले. सलग तिसऱ्या दिवशी घसरण अनुभवताना सोमवारचे विक्री सत्र कायम दिसून आले. ३०-शेअर्सचे बीएसई सेन्सेक्सने, ३५४ अंक किंवा ०.६८ टक्क्यांची घसरण घेत ५२,१९८ अंकांवर विश्रांती घेतली. निफ्टी निर्देशांकांनी १२० अंक किंवा ०.७६ टक्क्यांची घट दर्शवत १५६३२ अंकांवर विश्रांती घेतली. येत्या काही दिवसांत, १५८५०-१५९०० या अपसाइड लेव्हल्सवर लक्ष ठेवता येईल तर डाऊनसाईडमध्ये १५५००-१५४५० या लेव्हल्सवर लक्ष ठेवावे लागेल.

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Previous Post

निसर्गवारी परिवारातर्फे डिचोलीत वृक्षारोपण

Next Post

शाळांचा परिसर हिरवाईने समूध्द करण्यासाठी शिक्षकांनी वूक्षलागवडीवर भर द्यावा; गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे

Next Post

शाळांचा परिसर हिरवाईने समूध्द करण्यासाठी शिक्षकांनी वूक्षलागवडीवर भर द्यावा; गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे

ताज्या बातम्या

देशवासियांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा ! : ना. श्रीमंत रामराजे

August 15, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी स्पर्धेत मुंढेगावची वैष्णवी गतीर प्रथम

August 15, 2022

नवीन नागपूरच्या नियोजनबद्ध विकासाला राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 15, 2022

रानभाजी महोत्सावाचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

August 15, 2022

ज्ञानाधिष्ठीत समाज निर्मितीसाठी जिल्ह्यात ‘वाचक वाढवा’ मोहिमेस सुरुवात

August 15, 2022

सदरबझार पोलीस चौकीच्या नुतन इमारतीचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

August 15, 2022

अमृत महोत्सवी वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सारेच संकल्पबद्ध होऊ या : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 15, 2022

जिल्ह्याच्या विकासाची परपंरा अधिक वृद्धिंगत करणार – राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

August 15, 2022

महाराष्ट्राला देशातील अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने वाटचाल; सर्वजण मिळून देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

August 15, 2022

ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

August 15, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!